रोटरी क्लब खारघर मिडटाऊन तर्फे शिक्षकांचा सन्मान

 रोटरी क्लब खारघर मिडटाऊन तर्फे शिक्षकांचा सन्मान

खारघर/प्रतिनिधी,दि.५- 5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त रोटरी क्लब खारघर मिडटाऊन तर्फे  दि. 6 सप्टेंबर रोजी खारघर आणि परिसरातील शिक्षकांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .तसेच 10 वी व 12 वी मध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना  प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.  या प्रसंगी रोटरीचे माजी गव्हर्नर व प्रसिद्ध डॉक्टर रो . डॉ शैलेश पालेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .शिक्षकांचे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे याविषयी विवेचन केले.  रोटरी आणि रोटरीचे कार्य याबद्दलही माहिती दिली. या वेळी रोटरी अध्यक्ष रो डॉ रविकिरण,  सचिव रो सुप्रिया सावंत आणि रोटरी सदस्य , शिक्षक,  विद्यार्थी उपस्थित होते.