बंजारा समाजाला ST आरक्षण द्यावे – राष्ट्रीय विमुक्त घुमंतू जनजाती महासभा महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बंजारा समाजाला ST आरक्षण द्यावे – राष्ट्रीय विमुक्त घुमंतू जनजाती महासभा महाराष्ट्र राज्यांचे प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यवतमाळ प्रतिनिधी दि.५-अक्षय राठोड यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून बंजारा/लमाणा समाजाला हैद्राबाद गॅझेट नोंदींनुसार अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बंजारा/लमाणा समाज शतकानुशतके महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व मध्य प्रदेश या राज्यांमध्ये वास्तव्य करीत आहे. हैद्राबाद संस्थानकाळात प्रसिद्ध झालेल्या गॅझेट नोंदींमध्ये समाजाला अनुसूचित जमाती म्हणून मान्यता होती. मात्र महाराष्ट्र राज्य पुनर्गठनावेळी समाजाची नोंद चुकीच्या प्रवर्गात झाल्यामुळे समाजाला न्याय मिळालेला नाही.

आजही या समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक स्वरूप अनुसूचित जमातीसारखे असून शिक्षण, नोकरी व सामाजिक प्रगतीमध्ये समाज मागे आहे. संविधानातील अनुच्छेद 14, 15(4), 16(4) व 46 नुसार मागास व दुर्बल घटकांना विशेष संरक्षण व आरक्षणाचा अधिकार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधारे मागास घटकांचे वर्गीकरण करण्यास मान्यता दिलेली आहे.

 त्यामुळे हैद्राबाद गॅझेट नोंदी या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा/लमाणा समाजाला तातडीने ST प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ द्यावा, अशी ठाम मागणी राज्यांचे प्रदेश अध्यक्ष अक्षय राठोड  यांनी या निवेदनातून केली आहे. 

आणि यांच्यासह धनराज माळवे,अमोल रूनवाल, रमेश रूनवाल,

अमित राठोड,संतोष पवार,आत्माराव चव्हाण, संजय राठोड, आणि इतर पदाधिकारी हजर होते.