मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान मोफत आरोग्य तपासणी
*गणेशोत्सव मंडळांमध्ये रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, पीएफटी आणि डोळ्यांची तपासणी*
*नवी मुंबई* : मेडिकव्हर हॉस्पिटलने गणेशोत्सवादरम्यान खारघरचा राजा पंडाल, स्वप्नपूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक मंडळ आणि बाल गणेश मित्र मंडळ या चार गणेशोत्सव मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणीचे आयोजन करत सामुदायिक आरोग्याच्या दृष्टीने एक अर्थपूर्ण पाऊल उचलले आहे. या मंडळांमध्ये सायंकाळी ५:०० ते रात्री १०:३० वाजेपर्यंत फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे प्रसार करण्यात आला. चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद या संकल्पनेतंर्गत रुग्णालयाने भक्तांना उत्सवाचा आनंद घेताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहित केले. या आरोग्य शिबिरात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्तातील साखर, रक्तदाब, बॉडी मास इंडेक्स (BMI), इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG), फुफ्फुसांच्या कार्य चाचण्या (PFT) (दमा), डोळ्यांची तपासणी, फायब्रोस्कॅन, थायरॉईड संप्रेरक (TSH) अशा चाचण्या तसेच डॉक्टरांचा सल्ला यांचा समावेश होता. शिबिरांमध्ये सुमारे ५०० भाविकांनी आरोग्य तपासणी केली, त्यांच्या एकूण आरोग्य स्थितीबद्दल मौल्यवान माहिती मिळवली. सामान्य आरोग्य समस्यांबद्दल वेळीच निदान आणि जागरूकता वाढवून जीवनाचा दर्जा सुधारणे हा यामागचा उद्देश होता.
गणेशोत्सव हा मुंबई आणि महाराष्ट्रात मोठ्या भक्तीने साजरा केला जातो, जिथे हजारो भाविक एकत्र येतात तसेच दर्शनासाठी विविध मंडळांना भेट देतात. या उत्सवादरम्यान भाविकांनी त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण शरीर निरोगी असेल तर आपल्याला हा सणउत्सवाचा खराखुरा आनंद लूटता येतो. मेडिकव्हर हॉस्पिटलने उत्सवादरम्यान मोफत आरोग्य तपासणी करून आरोग्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले आहे, ज्यामुळे भाविकांना बाप्पाच्या आशीर्वादाबरोबच चांगल्या आरोग्याची भेट मिळाली आहे.
गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि उत्सवाचे प्रतीक आहे. भक्त बाप्पाचे आशीर्वाद घेतात, परंतु हे देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की चांगले आरोग्य हे सर्वांत मोठा आशीर्वाद आहे. या मोफत तपासणीद्वारे उपस्थित नागरिकांना त्यांच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्याची संधी मिळाली. या गणेशोत्सवात प्रत्येकाला चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळाल्याची प्रतिक्रिया *जनरल फिजीशियन डॉ. बादल ताओरी* यांनी स्पष्ट केले.
सण-उत्सव काळा हा जागरूकता पसरवण्यासाठी आणि लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी योग्य वेळ ठरत आहे. प्रत्येकाला निरोगी आणि आनंदी जीवन जगता यावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहु, *असे मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी स्पष्ट केले.*