सुएसो पालीचे के.आं.बांठिया माध्यमिक विद्यालय,एन.एन.पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालय व एस.ई.एस.इंग्रजी माध्यम नवीन पनवेलला एका भव्य समारंभात ISO मानांकन प्रदान
पनवेल/प्रतिनिधी,दि.५-सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे के.आं.बांठिया माध्यमिक विद्यालय,एन.एन.पालीवाला उच्च माध्यमिक विद्यालय व एस.ई.एस.इंग्रजी माध्यम नवीन पनवेलला एका भव्य समारंभात ISO मानांकन प्रदान करण्यात आले.
विद्यालयाच्या उत्तम गुणवत्तेसाठी प्रत्त्येक पैलूंचे दर्जेदार व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम दृष्टीकोन अनेक वर्षापासून शाळेने स्विकारला आणि त्यादृष्टीने शाळेची वाटचाल सुरू आहे.राज्य व देश पातळीवर विद्यालयाचा नाव लौकीक उंचावण्यासाठी विद्यालयाने शिक्षणाच्या दर्जाबरोबरच अनेक बाबींवरती काम करून अपेक्षित बदल स्विकारले आहेत.त्याचीच परिणती आज या विद्यालयाला ISO मानांकन मीळत आहे.रायगड जिल्ह्यात सुधागड एज्युकेशन सोसायटीची अनेक विद्यालये असून ISO मानांकन मीळवीणारे संस्थेचे हे पहिलेच विद्यालय आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सन्माननीय गीताताई पालरेचा या होत्या.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य माळी सर आणि संपूर्ण स्टापचे अभिनंदन केले आणि विद्यालयाचा उत्तरोत्तर उत्कर्ष घडवीण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे निर्देश दीले.
या सोहळ्यासाठी सु.ए.सो.चे जेष्ठ संचालक माननीय श्री.मोतीशेठ बांठिया, राजेंद्र पालवे सर संचालक सु .ए . सो . पाली व प्राचार्य कळंबोली विद्यासंकूल, मा श्री सिताराम मोहिते गटशिक्षणकारी, पनवेल,मा श्री.बी .एस .माळी प्राचार्य के आ . बांठिया हायस्कूल व एन् एन् पालीवाला ज्यु कॉलेज व अध्यक्ष रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ, मा श्री लहूपछांग सर प्राचार्य सिनियर कॉलेज पाली,मा.श्री. व्ही व्ही पाटील सर माजी मुख्याध्यापक व माजीअध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ, मा श्री विजय नाडे साहेब ISO हेड ऑफ डिपार्टमेंट महाराष्ट्र राज्य,मा श्री प्रकाश जोशी माजी अधिक्षक कळंबोली संकूल, मा श्री पंकज भगत सर अध्यक्ष पनवेल तालूका मुख्याध्यापक संघ,मा श्री अंतुले सर मुख्याध्यापक, मा श्री अजय सुर्यवंशी .उप प्राचार्य,अशोक आंब्रे,बी.यु.महाजन पर्यवेक्षक,गोखले ए जी पर्यवेक्षक,सौ.शलाका वेलनकर पर्यवेक्क्षिका,ज्यु कॉ.उप प्राचार्य बी.के.महाजन,सौ.कट्टा,उप मुख्याध्यापिका,सौ.आस्था परब पर्यवेक्षिका,सौ.आशालता पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख,निवेदिका सौ.पाटील टी.एस,श्री अजीत खरोसे,सौ.परब, सजावट- सौ.ज्योती भामरे आणि सहकारी यांनी प्राचार्य माळी सरांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
या कार्यक्रमासाठी आर.एस.पी.च्या मुला-मुलीच्या पथकाने लेझीम आणि वाद्यवृंदाचे सादरीकरण केले.
ISO मानांकन प्रदानाच्या या सोहळ्यासाठी या तीनही विद्यालयांचे शिक्षक-शिक्षिका काही ठराविक पेहरावामध्ये उपस्थित होते.त्याचबरोबर पनवेल तालुक्यातील अनेक निमंत्रित या सोहळ्याचे साक्षीदार झाले.