रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निलेश सोनावणे यांची निवड

 रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निलेश सोनावणे यांची निवड



पनवेल/प्रतिनिधी
केंद्रीय समाजी न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन  पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर पालिका क्षेत्र जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे  यांच्या मान्यतेने गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार निलेश रामचंद्र सोनावणे यांची  रिपाई पनवेल शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली  आहे.  रिपाई महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य सुमित मोरे यांच्या हस्ते पनवेल  महानगर पालिका क्षेत्र जिल्हाअध्यक्ष प्रभाकर कांबळे  यांनी निलेश सोनावणे यांना नियुक्ती  पत्र दिले .
गेली २५ वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करणारे निलेश सोनावणे हे जेष्ठ पत्रकार असून गेली २० वर्षे ते पनवेल युवा नावाचे स्वतःचे वर्तमान पत्र चालवतात ,सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करीत असल्याने २० पेक्षा अधिक पुरस्कारांनी  त्याना जिल्हा पातळीपासून देश पातळीवर गौरवले आहे . भारतीय बौद्ध महासभा सारख्या धार्मिक संघटनेने देखील त्यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविले आहे ,सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे ,डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन निर्मिती समिती मध्ये देखील त्यांनी विशेष काम केले होते , महाराष्ट्र शासनाचे त्यांनी  विशेष कार्यकारी अधिकारी पद (SEO  ) म्हणून देखील यांनी काम केले आहे .
या नियुक्तीच्या वेळी खांदेश्वर शहर अध्यक्ष दिनेश जाधव ,रिपाई युवा अध्यक्ष अक्षय अहिरे , नवीन पनवेल अध्यक्ष अंकुश साळवे ,  रिपाई कार्यकर्ते अमोल इंगोले , उपस्तिथ होते .त्यांच्या या निवडीबद्दल रिपाई रायगड जिख अध्यक्ष नरेंद्र गायकवाड ,रिपाई  जिल्हा प्रवक्ते  तथा पनवेल महानगर पालिका जिल्हा क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड,रिपाई तालुका अध्यक्ष विजय पवार ,सामाजिक , शैक्षणिक ,कला क्रीडा ,शासकीय ,  राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी निलेश सोनावणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .