खारघर मध्ये पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्ष यांचा निष्ठावंत सुसंवाद कार्यकर्त्ता मेळावा संपन्न
खारघर/प्रतिनिधी दि.७-आज दिनांक 6/8/2025 रोजी प्रदेश उपाध्यक्ष भावना ताई घाणेकर ,प्रदेश सचिव सूरदास गोवारी साहेब ,प्रदेश सरचिटणीस फारुख पटेल ,जेष्ठ नेते उत्तम दादा गायकवाड़ ,कोकण विभागीय अध्यक्ष प्रमोद बागल ,महिला जिल्हा अध्यक्ष राजश्री कदम ,नारायण खर्जे सर ,अविनाश पाटील जिल्हा युवक प्रदेश सरचिटणीस रहमान भाई सय्यद ,विधान सभा अध्यक्ष सनी फड़के ,विद्या चव्हाण ,अध्यक्ष कृष्णा मर्ढेकर ,युवक अध्यक्ष शहबाज पटेल ,खारघर शहर अध्यक्ष ज्ञानेश्रर शिंदे ,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत नवले ,सनी जमादार ,खांदा कॉलनी शहर अध्यक्ष प्रदीप म्हात्रे ,कामोठे अध्यक्ष महिंद्रा पाटील ,महिला खारघर अध्यक्ष कल्पना माने ,नामदेव पाटील ,जिल्हा युवक उपाध्यक्ष चाँद शेख ,श्रेयश भावसार ,फैसल तुपके ,शोएब पटेल यांच्या उपस्थितीत सुसवांद कार्यकर्ता मेळावा पार पडला .यावेळी अनेक कार्यकर्ते आवर्जून हजर होते .सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये विद्द्मान जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील यांच्याबद्द्ल नाराजीचा सुर होता .पाटील हे कळंबोलीच्या बाहेर येऊन काम करत नाहीत .सर्व समाजातील घटकांना बरोबर घेत नाहीत ,कुरघोडीचे राजकारण करतात ,कार्यकर्त्याला योग्य सम्मान देत नाहित ,कोणताही कार्यक्रम कलंबोली मध्येच घ्यायचा ,कामाचे लोक असतील जवळ करायचे अन्यथा त्यांना बाजूला करायचे त्यांना एकटे पाडायचे ,पक्ष वाढी साठी कोणतेही कार्यक्रम घेतले जात नाहित ,एखादा कार्यकर्त्ता चांगल काम करून पक्ष वाढी साठी काम करत असेल तर त्याला जाणून बुजुन त्रास देने आशा एक नाही अनेक समस्याचा पाढाच कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात मान्यवरासमोर मांडल्या .यावेळी भावना ताई घाणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना सर्वच्या मागे ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले .यावेळी ताई म्हणाल्या पक्ष पुढे घेऊन जात असताना सर्वच घटकाला सोबत घेऊन जायचे असते असे आदरणीय साहेब ,आदरणीय प्रशांत भाऊंची शिकवण आहे आणि तोच वसा पुढे नेण्याच काम मी करत आहे .जेव्हा जेंव्हा अन्याय होत राहील त्या त्या वेळी त्यांच्या मागे उभे राहील याची गवाही ताईंनी दिली .यावेळी सर्वच मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .यावेळी विद्द्मान अध्यक्ष मिळून काम करत नसतील आम्ही सर्वच जन प्रदेश कार्यालयात जाऊंन राजिनामा देऊ असे ठनकाऊन सांगितले .यावेळी पनवेल जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी ,महिला पदाधिकारी व बहुसंख्ये कार्यकर्ते उपस्थित होते .