आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज अटल फाउंडेशन व जागृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेंट्रल पार्क येथे वृक्षारोपण संपन्न

आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज अटल फाउंडेशन व जागृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेंट्रल पार्क येथे  वृक्षारोपण संपन्न 



खारघर – आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज अटल फाउंडेशन व जागृत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेंट्रल पार्क येथे  वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या उपक्रमात विविध प्रकारची शोभिवंत व सावली देणारी झाडे लावण्यात आली. स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यावरण संवर्धन व हिरवळ वाढविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेण्यात आली.

अटल फाउंडेशन व जागृत फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी सांगितले की, “आमदार श्री. प्रशांत ठाकूर यांच्या प्रेरणेतून समाजोपयोगी कार्ये अधिक जोमाने राबवली जातील.”या उपक्रमामुळे सेंट्रल पार्कचे सौंदर्य अधिक खुलणार असून नागरिकांसाठी शुद्ध हवा व पर्यावरणाचे संरक्षण साधले जाईल.

या कार्यक्रमास अटल फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, जागृत फाउंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरपूरिया, सचिव शिवमसिंह, जंदरभान, ललित चौधरी, रंजन शर्मा, दिनेशजी, चेतलाल, शैलेश पटेल, दिलीप पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image