कॉलनी फोरमचे पनवेल महापालिका आयुक्तांना निवेदन-नागरिकांना ९०% शास्ती माफी लावून कर भरून घ्यावा
खारघर/प्रतिनिधी दि.१-आज रोजी सकाळी साडेअकरा वाजता लीना गरड यांच्या नेतृत्वाखाली 50 लोकांच्या शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिका आयुक्त महोदयांना दिले आहे.पत्रामध्ये नमूद केलेल्या आशयाप्रमाणे मालमत्ता धारकांची जनभावना आयुक्त महोदयांना गांभीर्याने समजावून सांगितली. तसेच न्यायप्रविष्ट आणि नगर विकास विभागाच्या निर्णयासाठी प्रलंबित असलेल्या एक आक्टोबर 2016 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीतल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याचा आग्रह सोडून द्यावा, तसेच त्यानंतरच्या तीन आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर वेगळा दाखवून 90% शास्ती माफीची मुदत 15 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याची विनंती केली. तसेच नागरिकांकडे जेवढे शक्य आहे तेवढ्या रकमेवरच 90% शास्ती माफी लावून मालमत्ता कर भरून घ्यावा.
सदरबाबत आयुक्त महोदयांनी पुढील एक ते दोन दिवसात निर्णय देण्याचे आश्वासन दिलेले आहे.
*तोपर्यंत कॉलनी फोरमच्या वतीने मालमत्ता धारकांना स्पष्टपणे आवाहन करण्यात येते की, न्यायप्रविष्ट आणि नगर विकास विभागाच्या निर्णयासाठी प्रलंबित असलेल्या कालावधीचा मालमत्ता कर कोणीही भरू नये.*
शिष्टमंडळामध्ये कॉलनी फोरमचे मुख्य समन्वय श्री मधु पाटील , कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, कार्याध्यक्ष समाधान काशीद शहर संघटक अरुण जाधव अनिल पवार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत खरात इतर पदाधिकारी तसेच खारघर मधून मुख्य समन्वयक बालेश भोजने सौ अनिता भोसले असे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.