यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जबाबदारी वाढवणारा - आमदार विक्रांत पाटील
महेश म्हात्रे व विजय चोरमारे या ज्येष्ठ पत्रकारांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर केले विचारमंथन
नवी मुंबई (प्रतिनिधी)-
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई आयोजित यशवंतराव चव्हाण फाउंडेशन पुरस्कार वितरण सोहळा महानगरपालिका सभागृह, घणसोली, नवी मुंबई याठिकाणी दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. यावेळी आमदार विक्रांत पाटील, नामदार भरत पाटील, महाराष्ट्र रिसर्च सेंटर चे संपादक ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे, महाराष्ट्र दिनमान चे संपादक ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, रंजना शिंत्रे, चंद्रकांत चाळके, कविता कचरे, सुनिशा शहा, प्रमोद देशमाने, सुभाष बावडेकर, अमोल भिंगारदेवे, प्रकाश बोत्रे, प्रमोद साळुंखे, विक्रम मोरे, सचिन पवार, नंदा घोडमारे, एकनाथ तांबवेकर, भरत गायकवाड, अंकुश सावंत, प्रबोधनदिशाचे दत्ता सुर्यवंशी, प्रकाश कुराडे, राजु मारुती सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय खनिज महामंडळाच्या संचालक,(राज्य मंत्रीपद दर्जा) नामदार भरत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अधिक डाकवे यांनी सीए परीक्षेतील यशाबद्दल सत्कार करण्यात आला. साप्ताहिक यशवंतनिती विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जबाबदारी वाढवणारा आहे. महाराष्ट्राला चव्हाण साहेबांनी दिशा दिली आहे. त्यांच्या नावाने दिला पुरस्कार प्रेरणादायी आहे. पनवेल माझी कर्मभूमी आहे व कराड माझी जन्मभूमी आहे तिचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन आमदार विक्रांत पाटील यांनी केले.
विजय चोरमारे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र नामांकित लोकांना नवी मुंबई याठिकाणी चव्हाण साहेबांच्या नावाने गौरवण्यात येत आहे की या मुंबई या लोकांचे योगदान दिले आहे. माझ्या चरण गावातील शिवाजी नायकवडी व विशाल नायकवडी यांना या पुरस्काराने गौरविण्यात येत आहे यांचे कौतुक आहे. यशवंतराव चव्हाण यांचे विचार ऐकण्यासाठी भाग्य लाभले.
महेश म्हात्रे म्हणाले की, आज जो काही महाराष्ट्र सुसंस्कृत आहे तो यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मुळे आहे. नागरीकरण, राजकीय अवस्था, यशवंत विचार यावर त्यांनी भाष्य केले.
यावेळी सहकार विभागातुन महात्मा बसवेश्वर सहकारी पतपेढी, क्रीडा - शमिका चिपकर, विशाल बोबडे कुस्ती - तानाजी चवरे, शंकर होनमाने, शिक्षण- प्रतिभा शिवशरण, स्वप्नाली सुर्यवंशी, विजया मोहिते कला - जितेंद्र पवार उद्योजक - सुहास सावंत, निकिता आंब्राळे, सर्जेराव मांईगडे, निलेश भिंगारदेवे, कीर्ती पोळ, प्रिया यादव, सरस्वती भिलारे, सिमा भिलारे, राजेंद्र धादमे, दिपक मोरे,
सामाजिक - अपर्णा पाटील, बिंद्रा गणात्रा, माधवी सूर्यवंशी, मीना शेळके, नंदा डेरे, चित्रा गायकवाड, माधुरी परदेशी, महादेव साळुंखे, महेश हुकरे, शिवाजी नायकवडी , विशाल नायकवडी, श्रीपती सुतार, चंचला बनकर, एडवोकेट संतोष चव्हाण, मधुमती चव्हाण, विजय भोसले, अविनाश काटकर, कृष्ण सुतार, झुल्फीकर कुरेशी, अमृत चाळके, उत्तम माटेकर, दशरथ भालेकर, मेघना सुतार, ज्योती डुबल, विमल शेडगे, विरेंद्र म्हात्रे , सह्याद्रीचा दुर्गवेडा परिवार, नेहा बिराजदार, सुनिता पावसकर पत्रकार विभाग भीमराव धुळप,दत्ता खांदारे, पंकेश जाधव ,उद्धव मामडे , आशा तावडे, शंकर शिंदे, डी.टीआंबेगावे, हाजी खान,आप्पासाहेब मगर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण फाउंडेशनचे अध्यक्ष संजय रत्नाबाई किसन सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन शमा भिंगारदेवे यांनी केले.