बजरंग दल रायगड तर्फे खांदेश्वर शिवमंदिर ते गाढेश्वर शिव मंदिर अशी शिवकावड यात्रा-आ.प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

बजरंग दल रायगड तर्फे खांदेश्वर शिवमंदिर ते गाढेश्वर शिव मंदिर अशी शिवकावड यात्रा-आ.प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती 

पनवेल/प्रतिनिधी,दि-२८- अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दल रायगड विभाग पनवेल विधानसभा तर्फे खांदेश्वर शिवमंदिर ते गाढेश्वर शिव मंदिर अशी 'शिवकावड यात्रा' आयोजित करण्यात आली होती. या शिवकावड यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित राहून भगवान शिव शंकरांचे दर्शन घेतले व सर्वांना कावड यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. दरम्यान या कार्यक्रमाला आचार्य महामंडलेश्वर योगी सिद्धनाथ आघोर हे देखील उपस्थित होते. तसेच आयोजक अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलचे पदाधिकारी उपस्थित होते.