श्रावणाच्या पहिल्या सोमवारी खांदा कॉलनीतील श्रीराम पतसंस्थेकडून शिवभक्तांना अल्पोपहार ;कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली उपस्थिती

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी खांदा कॉलनीतील श्रीराम पतसंस्थेकडून शिवभक्तांना अल्पोपहार ;कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली उपस्थिती

 



पनवेल (प्रतिनिधी) खांदा कॉलनी येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेच्या पहिल्या वर्धांपनदिनानिमित्ताने पनवेलमधील जागृत देवस्थान असलेल्या खांदेश्वर मंदीरात तब्बल २०० किलो साबुदाणा खिचडी आणि ५०० डझन केळी असा उपवासाचा फराळ वाटप करण्यात आले. लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या फराळ वाटपाचा लाभ सोमवारी सकाळपासून हजारो शिवभक्तांनी घेतला.
श्री नागरी सहकारी पतसंस्था तुर्भे, नवी मुंबईचे अध्यक्ष रामदास पिंगळे, उपाध्यक्ष हनुमंत शेटे आणि खांदा कॉलनी शाखेचे मुख्य सल्लागार म्हणून ओंकारशेठ गावडे काम पहात आहेत. सेक्टर ७ खांदा कॉलनी येथे श्रीराम नागरी पतसंस्था कार्यान्वित आहे. हजारो ठेवीदारांच्या विश्वासावर पतसंस्थेची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. पदाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून श्रावणाच्या पहिल्या सोमवारी आलेल्या पहिल्या वर्धांपनदिनानिमित्ताने आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू केलेले फराळ वाटप नियोजनबध्द पध्दतीने यशस्वी होण्यासाठी शाखा सल्लागार मांगिलाल चौधरी, अर्चना खंडागळे, शाखा व्यवस्थापक राकेश भैय्ये आंदीनी परिश्रम घेतले. फराळ वाटपाच्या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, भीमराव पोवार, महादेव वाघमारे, शिवसेनेचे शहरप्रमुख सदानंद शिर्के, पतसंस्थेचे पदाधिकारी, उपस्थित होते.