पनवेलमध्ये 'महारोजगार मेळावा'; नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी

 पनवेलमध्ये 'महारोजगार मेळावा'; नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी


पनवेल (प्रतिनिधी) युवकांच्या समस्यांची जाण असलेले कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने शनिवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयात 'महारोजगार मेळावा २०२५' आयोजित करण्यात आला आहे.

या महारोजगार मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे असून, विविध क्षेत्रातील नामांकित व प्रतिष्ठित कंपन्या या मेळाव्यात मध्ये सहभागी होणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या युवकांना या माध्यमातून प्रत्यक्ष नोकरीसाठी निवड होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवीप्राप्त तसेच अकुशल उमेदवारही सहभागी होऊ शकतात. कंपन्यांच्या विविध विभागांमध्ये भरतीसाठी विविध प्रकारच्या पात्रता आणि क्षमतांनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हजारो रिक्त पदांवर भरती या मेळाव्यात होणार आहे.

मेळाव्याद्वारे परिसरातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळवण्याची संधी निर्माण होत असून, उद्योग आणि रोजगार यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सातत्याने राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने यंदाही महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले हे. या मेळाव्यात सहभागी व अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ९९३००७४५८७ किंवा ९९२०७६५७६५ या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या रोजगार मेळाव्याचा लाभ घेऊन युवकांनी आपले भविष्य घडवावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने करण्यात आले आहे.


Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image