वाजे येथील रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून वाजे ग्रामपंचायतीच्या हद्दीत वेळोवेळी विविध विकास कामे केली जातात, परंतु ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामस्थांनी हे काम व्यवस्थित होते की नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. रस्त्याचे काम होत असताना तो रस्ता जास्त काळ टिकून राहील, असे काम झाले पाहिजे असे मत या भूमिपूजन वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांनी व्यक्त केले.
या भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे नेते संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, वाजे ग्रामपंचायतच्या सरपंच भारती भालेकर, सुनील पाटील, विश्वजीत पाटील, अंकुश पाटील, धनजय पाटील, मुकेश फडके, अप्पा भगीत, राजेश भोईर, राजाराम भालेकर, शाम भालेकर, अंबाजी पाटील, राघो पाटील, शशी भगत, मदन पाटील, पाडू वाघ, वसंत बुवा, काळूराम भोईर, मेघा भगत, हरिचंद्र बुवा वाजेकर, महेंद्र पाटील, प्रमोद भालेकर, गोपीनाथ पाटील, पांडुरंग भगत, वासू भालेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते