सीकेटी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन व क्लॉथ डोनेशन ड्राइव्ह

 सीकेटी महाविद्यालयामध्ये  आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिन व क्लॉथ डोनेशन ड्राइव्ह


 पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स स्वायत्त महाविद्यालयातील नॅशनल कॅडेटस् कॉर्प्स (N.C.C.) विभागाकडून आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.  

          अंमली पदार्थांच्या सेवनामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर आणि सामाजिक जीवनावर होणारे गंभीर परिणामांवर एन.सी.सी. कॅडेट्सनी प्रकाश टाकला. ‘नशेला नाहीआयुष्याला होय असा संकल्प घेत विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थमुक्त जीवनाशैली अंगीकारण्यासाठी उपस्थित जनसमुदायास प्रेरित केले.    तसेच या जनजागृती रॅलीसोबतच रजू लोकांना कपडे वाटप करण्याचा एक स्तुत्य उपक्रम सुद्धा राबविण्यात आलाएन.सी.सीकॅडेट्सच्या पुढाकाराने संकलित केलेल्या कपड्यांचे वाटप करत सामाजिक बांधिलकीचा ऋणानुबंध आणखीन दृढ केलाया कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोडॉएसकेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  लेफ्टनंट प्रानीलिमा तिदार, सी.टी.डॉजितेंद्र पावरासी.टी.प्रा.सागर व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतलेसदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एन.सी.सी.च्या १०० कॅडेट्सनी महत्वपूर्ण भूमिका बजाविली.