तनेएराने जाहीर केली पहिल्यांदाच साडीवर ४० टक्के सवलत

 तनेएराने जाहीर केली पहिल्यांदाच साडीवर ४० टक्के सवलत 


                            योग्य, आकर्षक किमतीत विविध प्रकारच्या पारंपरिक पोशाखांची व्यापक श्रेणी  


पनवेल (प्रतिनिधी) टाटाचा ब्रँड असलेल्या तनेएराने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सुमारे तीस टक्के वाढ नोंदवली असून आर्थिक वर्ष २६ च्या सुरुवातीलाही लग्नसराईच्या मजबूत खरेदीचा प्रभाव आहेत्यातून ब्रँडच्या वाढीचा कल, प्रवाह कायम राहत आहे. या सकारात्मक प्रवासास चालना देततनेराने आपल्या पहिल्यावहिल्या राष्ट्रीय सेलची घोषणा केली आहेत्यामध्ये साड्यारेडी-टू-वेअर सेट्सअनस्टीच्ड कुर्ता सेट्स आणि सणासुदीसाठीच्या लेहेंगासारख्या विविध श्रेणींमध्ये तयार केलेल्या शुद्ध व नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेल्या उत्पादनांवर ४० टक्के पर्यंत सवलत दिली जात आहे.

        ४१ शहरांमध्ये ८० दालनांचे मजबूत राष्ट्रीय जाळे असलेल्या तनेएराने पारंपरिक वस्त्रप्रावरण परिधानसाठी प्रमुख पर्याय म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. यावर्षी सणासुदीचा हंगाम लवकर सुरु होत असताना हा सेल या हंगामाची सुरुवात झाल्याचे जाहीर करण्यासाठी आणि ग्राहकांना तनेएराच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन ठळकपणे सिद्ध करणाऱ्या शुद्ध आणि अस्सल  उत्पादनांचा संग्रह करण्याची संधी देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे.या प्रसंगी बोलतानामुख्य विक्री आणि विपणन अधिकारी सोमप्रभ कुमार सिंगम्हणाले, “पहिल्यांदाच इतक्या विस्तृत श्रेणीवर आम्ही एवढी सवलत देत असून उत्पादने ४० टक्केपर्यंत सवलतीत उपलब्ध आहेत. ही सवलत योजना म्हणजे तनेएरा ब्रॅंड ज्यासाठी ओळखला जातो त्या  शुद्धता व समृद्धतेच्या अनुभवाबरोबर मिळणारा एक अतिरिक्त लाभ आहे. अस्सलरीत्या मिळवलेली हस्तकला उत्पादने तसेच प्रत्येक पोषाखात मिळणारी शुद्धतेची आणि गुणवत्तेची हमी याद्वारे आमच्या चोखंदळ ग्राहकांसाठी हा अनुभव खास बनविण्याचे आमचे ध्येय आहे.”बनारसीकांजीवरमजामदानी ते टसर यांसारख्या विविध प्रकारच्या साड्या ब्रँडच्या पोतडीत असून त्या भारतातील विणकाम परंपरा जपणाऱ्या कारागिरांना एक सलाम आहे. 

     प्रत्येक तनेएरा दालन साडीप्रेमींसाठी एक निवासस्थानासारखे डिझाइन केलेले असूनयेथे लग्नासाठी विशेष विभागसणासुदीच्या कार्यक्रमाच्यावेळी परिधान करायच्या कपड्यांचा वेगळा विभाग आणि रोजच्या वापरातील आवश्यक गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध आहेत. ग्राहकांसाठी सिल्ककॉटन इकतकोटा डोरियाचंदेरी आणि महेश्वरीसाउथ सिल्क्ससंबळपुरी आणि व्हेगन कलेक्शन्ससारख्या विविध विणकाम केंद्रांमधून खास निवडलेली उत्पादनेही उपलब्ध आहेत. हर एक पोषाखातून भारताच्या समृद्ध वस्त्र परंपरेचा गौरव करत गुणवत्तेच्याबाबतीत तडजोड न करणाऱ्या तनेएरा कडून अस्सल कारागिरीचे चिन्ह म्हणून ‘शुद्ध झारी कांजीवरम’ असे प्रमाणपत्र दिले जाते.ग्राहक नवी मुंबईतीलइनऑरबिट मॉल येथील तनेएरा शोरूम मध्ये ही सवलत घेऊ शकतात.