साहित्य पाठविण्याचे आवाहन
उरण दि ११( विठ्ठल ममताबादे ) उरण येथून गेली २९ वर्षे नियमित प्रकाशित होणाऱ्या झुंजार मत दिवाळी अंकासाठी राज्यभरातील साहित्यिकांकडून साहित्य मागविण्यात येत आहे. यावर्षी झुंजार मतच्या वतीने २९ वा दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. या दिवाळी अंकामध्ये ग्रामीण बाजावर आधारित साहित्याला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच ऑपरेशन सिंदूर बाबतच्या कथा , ग्रामीण बाजावर आधारीत कथा , महिला अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांवरील विशेष लेख , आणखी किती वैष्णवी हगवणेंनी जीवन संपवायचे, शेतकऱ्याची आत्मकथा , जमिनी ओरबाडताय तर मग जगायचे कसे ?, धर्म कुठे सांगतो की आतंकवादी बना, होय मी पोटासाठी माझे शरीर विकते , पोटासाठी नाचते मी परवा कुणाची आदी विषयांवरील लेख , कविता , सामाजिक लेख , चूटकूले , तसेच ग्रामीण भागातील सणवार , रुढी परंपरा आणि पर्यटन , शेतीवरील ग्रामीण क्षेत्रातील विविध प्रयोग ,ग्रामीण भागातील आजीबाईच्या बटव्यातील औषधे , जत्रा पालख्यांची मजा , विनोदी साहित्य आदी प्रकारचे लिखाण करणार्या साहित्यिकांनी साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साहित्यिकांनी आपले साहित्य १७ ऑगस्ट २०२५ पुर्वी मिळेल अशा बेताने संपादक श्री अजित पाटील , आई निवास , खोपटे ,पाटील पाडा , पोस्ट कोप्रोली , ता.उरण पिन कोड ४१०२०६ या पत्त्यावर किंवा युनिकोड मराठी फॉन्टध्ये टाईप केलेले लिखाण ajitdadapatil@gmail.com या इ मेल आय डी वर पाठवावे असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त साहित्यिकांच्या लिखाणाला या वर्षीच्या दिवाळी अंकात स्थान देण्याचा प्रयत्न केला जाणार असून साहित्यिकांनी साहित्य पाठविताना आपला पुर्ण पत्ता आणि एक फोटो देखील पाठवावा असे आवाहन झुंजार मत च्या वतीने करण्यात आले आहे.