मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
*नवी मुंबई -* शनिवारी २१ जून रोजी खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. ६० हून अधिक नागरिक व कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले होते. योगाभ्यासाद्वारे उपस्थितांना दैनंदिन जीवनशैलीत योग्यभ्यासाच्या सरावाचे फायदे सांगण्यात आले.
मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये केवळ उपचारांबद्दल नाही तर प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैलीबाबतही वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. हे योग सत्र याचे एक उदाहरण ठरले आहे. लोकांना निरोगी सवयी स्वीकारण्यास आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास प्रेरित करणारे असे आणखी उपक्रम हाती घेण्याचे आमचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया *मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशाचे प्रादेशिक संचालक नीरज लाल यांनी स्पष्ट केले.*