पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम, गोशाळा भेट आणि महाआरती
पनवेल (प्रतिनिधी) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका ग्रामीण उत्तर मंडलाच्या वतीने एक भक्तिपूर्ण आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पेंधर फाटा येथील शिवमंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, त्यानंतर जवळील गोशाळेला भेट देण्यात आली आणि समारोप महाआरतीने करण्यात आला.
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद केणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेतृत्व भाजप उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर यांनी केले.कार्यक्रमात ज्येष्ठ नेते कृष्णा पाटील, युवा नेते विनोद घरत, किरण दाभणे, नितीन भोईर, भास्कर आगलावे, बाळकृष्ण पाटील, विशाल खानावकर, आशिष कडू, अंकुश पाटील, समीर गोंधळी, आकाश फडके, पवन भोईर, शुभम खानावकर, विनीत खानावकर, करण फडके तसेच भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाद्वारे सामाजिक स्वच्छतेचा संदेश देण्याबरोबरच जनतेमध्ये धार्मिक व सांस्कृतिक जाणीवा जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि त्याग आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करून त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा हेतू या माध्यमातून साध्य करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता सामूहिक महाआरतीने करण्यात आली.