लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक सीबीएसई स्कूलमध्ये "आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५” अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी

 लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक सीबीएसई स्कूलमध्ये "आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५” अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेची वर्ग अंतर्गत फेरी 



पनवेल (प्रतिनिधी) कोशिश फाउंडेशन व पनवेल महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५  वक्तृत्व स्पर्धेच्या”  वर्ग अंतर्गत फेरीची सुरुवात आज (दि. २५) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे कामोठे मंडल अध्यक्ष व माजी नगरसेवक विकास घरत, मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या हर्जिंदर कौर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष स्पर्धा प्रमुख मयुरेश नेतकर, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव आदी उपस्थित होते. 
            यावेळी इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि तयारीने विविध विषयांवर भाषणे सादर केली. “माझा शाळेतील पहिला दिवस”, “माझं स्वप्न”, “प्लास्टिकमुक्त भारत”, “इंटरनेट: वरदान की शाप” अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी विचार मांडले. स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध रित्या पार पडली. विद्यार्थ्यांनी दाखवलेला आत्मविश्वास व संवाद कौशल्य पाहून उपस्थित पालक आणि शिक्षक भारावून गेले. स्पर्धेतील निवडक विद्यार्थी पुढील शाळा अंतर्गत फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी आणि प्रभावी संवाद कौशल्य विकसित होईल, असा विश्वास शाळेच्या शिक्षक व आयोजकांनी व्यक्त केला.

कोट- 
"आमदार प्रशांत ठाकूर चषक २०२५  वक्तृत्व स्पर्धा" अंतर्गत झालेल्या वर्ग अंतर्गत फेरीत विद्यार्थ्यांनी सादर केलेले विषय अतिशय वैविध्यपूर्ण आणि महत्वपूर्ण होते. प्रत्येक भाषणात त्यांच्या कल्पकतेचा आणि विचारशक्तीचा सुंदर आविष्कार दिसून आला. विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा यशस्वी केली असून आता पुढील फेरीसाठी अधिक जोमाने तयारी करत आहेत. वक्तृत्व स्पर्धा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. या उपक्रमासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही कोशिश फाउंडेशन व पनवेल महानगरपालिकेचे मन:पूर्वक आभार मानतो. त्यांच्या पुढाकारामुळेच विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करण्याचे हे दर्जेदार व्यासपीठ मिळाले.
– अविनाश कुलकर्णी, मुख्याध्यापक, लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, कामोठे

कोट- 
मी रामशेठ ठाकूर पब्लिक सीबीएसई स्कूल कामोठे येथे शिकते. मी आमदार श्री प्रशांत ठाकूर चषक वकृत्व स्पर्धेत भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या व तिसऱ्या दोन्ही आवृत्त्यांमध्ये मी सहभागी झाले आहे. मी दोन्ही वेळा वर्ग अंतर्गत स्तरावर प्रथम क्रमांकाची मेडल जिंकली आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतिशय सुंदर अनुभव होता.  - श्रेया माने, ८वी अ