मे केन्स्पेक केमिकल्स कंपनीच्या मॅनेजमेंट मुळे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो
पनवेल / प्रतिनिधी
तळोजा आद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मे केन्स्पेक केमिकल्स प्रा ली कंपनीने स्थानिक १०४ तरुणांना कोणतेही ठोस कारण न देता कामावरून कमी केले आहे याबाबत गेली अनेक महिने हे कामगार बेरोजगार झाले आहेत १५ एप्रिल २०२५ पासून कामगारांनी कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन
सुरु केले आहे कंपनीतील मॅनेजमेंट हे कामगार आणि मालक यांच्या मध्ये गैरसमज करीत असल्याने मालक वृषभ व्होरा याना कामगारांची बाजू मांडू न देता अंधारात ठेऊन भडकवत असल्याचे कामगारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अहिरे ,रसाळ हे जबादार असल्याचे कामगारांनी सांगितले आहे .
तळोजा आद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या मे केन्स्पेक केमिकल्स प्रा ली कंपनी मध्ये आजूबाजूच्या गावातील कामगार गेली दहा ते वीस वर्षे कंपनीच्या विविध विभागात काम करीत आहेत डिसेंबर २०२३ मध्ये कंपनीला आग लागल्याने उत्पादन प्रक्रिया बंद करण्यात आली होती कंपनी सुरु झाल्यावर परत आपल्याला कामावर घेतले जाईल या आशेने सर्व कामगार कंपनी सुरु होण्याची वाट बघत होते मात्र कंपनी सुरु झाल्यावर काही कामगारांना कंपनीने कामावर घेतेले मात्र स्थानिक भूमिपुत्र असलेल्या या १०४ कामगारांना घराचा रस्ता दाखवला या बाबत कामगारांनी विविध विभागाकडे पाठपुरावा करीत न्याय हक्कासाठी लढाई सुरु केली आहे ,कंपनी कंत्राटदाराच्या माध्यमातून बाहेरील कामगार आणून काम करून घेत आहे ,मात्र भूमिपुत्रांना सामावू घेण्यास टाळाटाळ करीत आहे .व्यवस्थापनातील काही मंडळी जाणीवपूर्वक मालक आणि कामगारांमध्ये संघर्ष घडवून आणत आहे कंत्राटदाराला हाताशी घेऊन बाहेरील कामगारांकडून काम करून घेत आहे कंपनीचे मालक व्होरा याना रसाळ अहिरे हि मंडळी काही कामगारांच्या बाबतीत भडकवत आहेत .स्थानिक कामगार नको हि आडमुठी भूमिका घेत असलेले मॅनेजमईन्ट मधील रसाळ अहिरे यांच्या कुटुंबावर अन्याय झाल्यास त्यांनी काय केले असते आज आमही अनेक महिने रोजगारावाचून आहोत रसाळ, अहिरे मालकाची मर्जी राखण्यासाठी सगळ्या यंत्रणेला पाकीट पोहचवून आमच्यावर दबाव आणत आहे, पोलिसांना हाताशी धरून खोट्या केस कामगारांवर करीत आहेत , काही गुंड मॅनेजमेंट मधील अभय रसाळ,शाम अहिरे यांनी ठेवले असून ते कामगारांना धमकावत असल्याचे कामगारांनी सांगितले आहे. मॅनेजमेंट मधील अभय रसाळ,शाम अहिरे ह्यांच्यामुळे तळोजा एम आय डी सी मधील वातावरण चिघळत आहे आम्ही अहिरे यांच्यावर विश्वास ठेऊन दोन वर्षे घालवली मात्र अहिरे हे आपल्या स्वार्थासाठी आणि आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळवण्यासाठी मालक आणि कामगारनमध्ये संघर्ष घडवून आणत आहेत त्यामुळे कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास हे दोघे याला जबाबदार असतील असे कामगारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे