भाजपातर्फे जॉब इंटरव्यूचे यशस्वी आयोजन,-" प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने तरुणांना मिळाला रोजगार"

भाजपातर्फे जॉब इंटरव्यूचे यशस्वी आयोजन,-" प्रितम म्हात्रेंच्या पुढाकाराने तरुणांना मिळाला रोजगार"





पनवेल : पनवेल, नवी मुंबई, मुंबई परिसरामध्ये नोकरीच्या अनेक संधी तरुणांसाठी उपलब्ध आहेत. त्या तरुणांना मिळण्यासाठी  एक पाऊल म्हणून 29 जून रोजी भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत जॉब इंटरव्यूचे आयोजन केले होते. यावेळी बायकर, बॅक ऑफिस, ऑपरेशन स्टाफ, पिकर पॅकर, फिल्ड ऑडिटर, डिलिव्हरी एक्झिक्यूटिव्ह, सपोर्ट  स्टाफ, व्हॅन बॉय, काउंटर स्टाफ इन्स्टॉलर /हेल्पर, फार्मासिस्ट या पदासाठी जॉब इंटरव्यू घेण्यात आले. यावेळी 500 पेक्षा जास्त तरुणांनी नोंदणी केली होती. यावेळी तरुणांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार  मुलाखत घेऊन त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी देण्यात आल्या. आमदार श्री.प्रशांतजी ठाकूर यांच्या हस्ते  दीप प्रज्वलन करून याचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेलचे मा.नगराध्यक्ष श्री. जे एम म्हात्रे साहेब यांची उपस्थिती होती. पनवेल शहरातील भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालय येथे या "जॉब इंटरव्यूचे" आयोजन करण्यात आले होते. नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेऊन श्री.प्रितमदादा म्हात्रे यांनी अशा प्रकारे संधी मिळवून दिली त्याबद्दल तरुणांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
           यावेळी मा.नगरसेवक श्री.गणेश कडू, श्री.गणेश पाटील,श्री.सुनील बहिरा, श्री.अनिल भगत, श्री.रवींद्र भगत, मा.नगराध्यक्ष सौ अनुराधा ठोकळ, नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, डॉ.सौ सुरेखा मोहकर, सौ.सारिका भगत, सौ.रेणुका मोहकर, सौ सरस्वती काथारा, सौ.कविता ठाकूर,श्री.संतोष पाटील, श्री.राजेंद्र पाटील, श्री.प्रदीप आंग्रे, श्री.अजित अडसूळ, युवा नेते मंगेश अपराज उपस्थित होते.
       

*कोट*
नोकरी करत असताना आपल्या गुणवत्तेच्या अनुसार योग्य  ठिकाणी संधी उपलब्ध व्हावी या हेतूने आम्ही या जॉब इंटरव्यूचे आयोजन केले होते. गुणवत्तेनुसार त्यांना उपलब्ध असलेल्या एक पेक्षा अनेक संधी आम्ही त्यांच्यापर्यंत आज या शिबिराच्या माध्यमातून पोहोचवल्या. भविष्यात अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. पनवेल परिसरात येणाऱ्या नोकरीच्या संधीसाठी तरुणांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविणार आहोत.- प्रितम जनार्दन म्हात्रे, मा.विरोधी पक्षनेते, पनवेल महानगरपालिका

Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
पनवेल परिसरातील ओपन लॉनवरील विवाह समारंभाला आता पहिली पसंती; हटके लग्न सराई, ठरतेय मुख्य आकर्षक
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image