सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

 सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा




योग म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचा एकमेकांशी यथायोग्य समन्वय आणि संसूचन साधणे होय. याच धर्तीवर २१ जून हा दिवस भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात आणि विश्वभर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. सदर दिवसाच्या औचित्याने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल (स्वायत्त) च्या जिमखाना असोसिएशन, राष्ट्रीय सेवा योजना,  नॅशनल कॅडेट कॉर्प्सआजीवन अध्ययन तथा विस्तार विभाग आणि आर्ट ऑफ लिव्हींग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘योग सत्राचे’ आयोजन शनिवार,दि. २१ जून २०२५ रोजी सकाळी ६:४५ वाजता महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात करण्यात आले.

 

सदर सत्राची सुरवात योग प्रशिक्षकांच्या स्वागताने झाली, यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी आर्ट ऑफ लिव्हींगचे योग प्रशिक्षक श्री. चंद्रशेखर सापळे, श्री. संजय म्हात्रे आणि श्री. कुणाल पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सर्व उपस्थितांना संबोधित करताना महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील यांनी ‘शरीर आणि मन दोन्ही नैसर्गिक पद्धतीने निरोगी ठेवण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केलेयानंतर महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एन.सी.सी. च्या ५२ कॅडेट्सनी वृक्षासन, ताडासन, अनुलोक-विलोम, प्राणायाम आदी उत्स्फुर्तपणे सादर करत 'एक पृथ्वी- एक आरोग्यासाठी योगया संकल्पनेतून सर्वांगीण कल्याण आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढवण्यात योग्य विद्येचे अनन्य साधारण महत्व आहेअसा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ.बी.डी.आघाव वाणिज्य शाखेचे प्रमुख प्रो. डॉ. एस.बी. यादव, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही.बी. नाईक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अध्यक्ष  डॉ. आर. व्ही. येवले, नॅशनल कॅडेट कॉर्प्स च्या असोसिएट एन.सी.सी. ऑफिसर प्रा. एन. पी. तीदार, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. वाजेकर, विभागांचे विभागप्रमुख, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, योगसत्राचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. व्ही. पाटील तर आभार प्रदर्शन जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही.बी. नाईक यांनी केले.

          सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना समिती, राष्ट्रीय सेवा योजना, नॅशनल कॅडेट कॉर्प्स, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग या समितीमधील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.