मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर

 मासेमार नौकाधारकांना डिझेल प्रतिपूर्ती अनुदान मंजूर


*दोन कोटी ३६ लाखांचे अनुदान मंजूर*

*३०० नौका मालकांना मिळणार लाभ* 

सिंधुदुर्गनगरी दिनांक २३ (जिमाका) :-  महाराष्ट्र शासनाने मासेमार नौकाधारकांसाठी डिझेल प्रतिपूर्ती योजना कार्यन्वित केलेली आहे. यामध्ये नौकाधारकांनी मच्छिमारीसाठी वापरलेल्या डिझेल वरील मूल्यवर्धित कर परतावा देण्यात येतो. १९ जूनच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० मत्स्य सहकारी संस्थांच्या नौका मालकांना २  कोटी ३६ लाख १७ हजार ५५० एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

 ही रक्कम दि.२३ जून २०२५ रोजी पासून जिल्ह्यातील एकूण ३०० नौका मालकांच्या खाती VPDA प्रणाली अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे. मे २०२५ अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमार नौका धारक यांचा रु. ४ कोटी ३६ लाख ५ हजार ८१५ एवढा डिझेल परतावा प्रलंबित होता. प्रलंबित रक्कम लवकरात लवकर मंजूर करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे. 

पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी बंद असताना सदर परतावा अनुदान रक्कम मंजूर केल्याने मासेमार नौकाधाराकांनी शासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे.


Popular posts
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
Image