ऑटिझमग्रस्त झिम्बाब्वेच्या ७ वर्षीय मुलावर भारतात सेल बेस थेरपीने यशस्वी उपचार

ऑटिझमग्रस्त झिम्बाब्वेच्या ७ वर्षीय मुलावर भारतात सेल बेस थेरपीने यशस्वी उपचार

*नवी मुंबई* : रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट  आणि स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. प्रदीप महाजन यांच्या नेतृत्वाखालील टिमने झिम्बाब्वे येथील ऑटिझमग्रस्त ७ वर्षांच्या शॉन अपुवानाशेवर सेल बेस थेरेपीने यशस्वी उपचार करत त्याला नवे आयुष्य मिळवून दिले.

शॉन अपुवानाशेला आयुष्याच्या सुरुवातीलाच विकासात्मक आव्हानांचा सामना करावा लागला. ऑटिझम असलेल्या इतर मुलांप्रमाणेच त्याला देखील  स्वतःला व्यक्त करण्यात, सामाजिक संबंध निर्माण करण्यात आणि दैनंदिन क्रियांमध्ये अडचण येत होती. त्याचे पालक खूप चिंतातूर झाले होते. परंतु मुल बरे होण्याची जिद्द न सोडता त्यांनी भारतातील स्टेमआरएक्स हॉस्पिटलविषयी माहिती गोळा केली आणि तिथे नाविन्यपूर्ण उपचार पर्याय अवलंबविण्याचा निर्णय घेतला.

*स्टेमआरएक्स हॉस्पिटलचे संस्थापक आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. प्रदीप महाजन सांगतात की,* शॉनवर उपचार सुरू झाले तेव्हा त्याच्या विशिष्ट गरजांनुसार रिजनरेटिव्ह उपचारांची मदत घेण्याचा निश्चय केला. यामध्ये स्टेम सेल थेरपी, न्यूरो-रिहॅबिलिटेशन, ऑक्युपेशनल थेरपी, सेन्सरी इंटिग्रेशन, बिहेवियरल थेरपी आणि पोषणविषयक मार्गदर्शन यासारख्या उपचारांचा समावेश होता, ज्याचा उद्देश ऑटिझम असलेल्या मुलांना त्यांची सर्वोत्तम क्षमता साध्य करण्यास मदत करणे हा होता. उपचार सुरू केल्यानंतर लगेचच शॉनने त्यास उत्तम प्रतिसाद दिला. जरी बदल लहान असले तरी ते त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी खूप अर्थपूर्ण होते. तो अधिक चांगला प्रतिसाद देऊ लागला, लक्ष केंद्रित करु लागला आणि संवाद साधण्याचे नवीन मार्ग शोधण्यास सुरुवात करत होता, ज्यामुळे त्याच्या कुटुंबियांना आनंद आणि आशेचा नवा किरण मिळाला.

*डॉ. प्रदीप महाजन पुढे सांगतात की,* आम्ही ऑटिझमवर उपचार करण्यासाठी एक समग्र आणि वैयक्तिकृत दृष्टिकोन प्रदान करतो, ज्यामध्ये विकासात्मक वाढीसाठी आणि जीवनाची एकूण गुणवत्ता सुधारण्यासाठी रिजनरेटिव्ह आणि सहाय्यक उपचारांचा समावेश आहे. या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी स्टेम सेल थेरपी आहे, जी न्यूरोलॉजिकल कार्य सुरळीत करण्यात मदत करते. स्पीच आणि ॲाक्युप्शनल थेरेपी मुलांना अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यास आणि स्वतंत्रपणे दैनंदिन क्रिया करण्यास मदत करते. मेंदूचे आरोग्य आणि एकूण कल्याणाकरिता पोषक आहार प्रदान केला जातो. या प्रवासात अधिक कुटुंबांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,  योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास, ऑटिझम असलेली मुलं देखील सर्वसामान्य आयुष्य जगु शकतात.

*शॉनच्या आईने सांगितले* , जेव्हा आम्ही शॉनला स्टेमरएक्समध्ये आणले तेव्हा आम्हाला काय अपेक्षा करावी हे माहित नव्हते. पण पहिल्या दिवसापासून आम्हाला त्याच्यामध्ये सकारात्मक बदल जाणवले. तो अधिक सतर्क झाला आहे, आम्हाला चांगला प्रतिसाद देत आहे आणि तो कधीही करू शकला नाही अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे हे पाहून खूप आनंद होत आहे. या प्रवासाने आमच्या मुलाची क्षमताच नाही तर आम्ही आमची आशा देखील परत मिळवली आहे. डॉ. महाजन आणि संपूर्ण टीमचे मार्गदर्शन आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे खुप आभारी आहोत. आता, आम्ही झिम्बाब्वेला परत जाण्यास उत्सुक आहोत आणि शॅान देखील पुन्हा शाळेत जाण्यास आणि त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.