ग्रामसेवक निवृत्ती आंधळेवर कारवाई करण्याची जागृती फाऊंडेशनची मागणी

 ग्रामसेवक निवृत्ती आंधळेवर कारवाई करण्याची  जागृती फाऊंडेशनची   मागणी

पनवेल प्रतिनिधी
कराडे खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक निवृत्ती आंधळे  हे आपल्या कर्त्यव्यात कसूर करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची  मागणी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी  पनवेल पनवेल  समितीचे  गटविकास अधिकारी ,जिल्हापरिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. माहिती अधिकारात माहिती न देणे ,माहिती देण्यास टाळाटाळ करणे प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने  आदेश देऊन हि माहिती न देणे ,ग्रामपंचायत च्या  एकूण  उत्पनापैकी १५ टक्के निधी हा दलित समाजाच्या  विकासासाठी वापरण्यास टाळाटाळ करणे या मुळे कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली  आहे
 कराडे खुर्द ग्रामपंचायत चे ग्रामसेवक हे आपल्या कर्तव्यात कसूर करीत असून त्यांच्यावर लोकसेवकाने कायदयाची अवज्ञा करणे भारतीय दंड संहिता कलम १६६अ, शासन आदेशांचे पालन न करणे भारतीय दंड संहिता कलम १८८,कायदयाच्या निर्देशनाची अवमानना करणे भारतीय दंड संहिता कलम २१८, शासनाच्या ध्येय धोरणाविरुध्द कामे करणे, बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा १९६७ कलम ३,१०, ११, १६, १६अ, ३८,३९ व ४०, शासकीय नोकराने जनेतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०९ नुसार कायदेशीर  कारवाई करणेत यावी  अशी मागणी जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी केली आहे