रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच स्ट्रोक प्रतिबंधासाठी ८० वर्षीय रुग्णावर यशस्वी उपचार-वॉचमन एफएलएक्स डिव्हाइसचे यशस्वी प्रत्यारोपण
नवी मुंबई:* मेडिकव्हर हॉस्पिटलमधील वरिष्ठ इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि व्हॉल्व्ह तज्ञ डॉ. अनुप महाजनी यांच्या नेतृत्वाखालील टिमने नवी मुंबई आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच वॉचमन एफएलएक्स डिव्हाइस इम्प्लांटेशन करण्यात आले आहे. एका ८० वर्षीय रुग्णावर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्ण क्रॉनिक अॅट्रियल फायब्रिलेशन (एएफ) ग्रस्त होती आणि रक्त पातळ करणाऱ्या औषधांमुळे (इंट्राक्रॅनियल हेमोरेज, म्हणजेच कवटीत रक्तस्त्राव) सारख्या जीवघेण्या गुंतागुंतींचा सामना करत होता.
*कलकत्ता येथे राहणाऱ्या ८० वर्षीय रुग्णाला स्ट्रोक प्रतिबंधासाठी उपचाराकरिता* दिलेल्या अँटीकोएगुलेशनमुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. ते डॉ. महाजनी यांच्याकडे उपचारासाठी आले. सुरुवातीला रक्तस्रावामुळे मेंदूचा दाब कमी करण्यासाठी क्रॅनियोटॉमी करण्यात आली. एका आठवड्यानंतर रुग्णाच्या तब्येतीत काहीशी सुधारणा झाली. स्ट्रोक टाळण्यासाठी या रुग्णाला अँटीकोएगुलेशन द्यावे लागत होते मात्र त्यामुळे होणाऱ्या अंतर्गत रक्तस्रावामुळे ते थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अॅट्रियल फायब्रिलेशनमुळे स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी तो सामान्यतः लिहून दिलेले ओरल अँटीकोएगुलेंट घेत होता. त्याला अॅस्पिरिन पोस्ट-एंजिओप्लास्टी (पीटीसीए) सारख्या अँटीप्लेटलेट औषधांची देखील आवश्यकता होती, परंतु अँटीकोएगुलेंट्स पुन्हा सुरू केल्याने मेंदूतील रक्तस्त्रावाचा धोका वाढू शकतो. रक्तस्त्रावाचा धोका असूनही, रुग्णाला कार्डिओएम्बोलिक स्ट्रोक, हृदयरोगाचा उच्च धोका होता.
*या गुंतागुंतीच्या आव्हानांना तोंड देत, मेडिकव्हर हॉस्पिटलमधील डॉ. अनुप महाजनी यांच्या* नेतृत्वाखाली टीमने लेफ्ट अॅट्रियल अॅपेंडेज ऑक्लुजनसाठी वॉचमन एफएलएक्स डिव्हाइस इम्प्लांटेशन हे एक नवीन व प्रभावी उपचार पर्याय निवडले. एलएए हा हृदयातील एक लहान थैली आहे जिथे एएफ रुग्णांमध्ये अनेकदा गुठळ्या तयार होतात. टीईई (ट्रान्ससोफेजियल इकोकार्डियोग्राफी) आणि फ्लोरोस्कोपीतंर्गत फेमोरल शीरेतून विशेष उपकरणाचा घालून या भागाला बंद करून, टीमने रुग्णामध्ये दीर्घकालीन भासणारी अँटीकोएगुलेशनची आवश्यकता दूर केली.
हे उपकरण अॅट्रियल फायब्रिलेशन असलेल्या रुग्णांसाठी एक जीवनरक्षक ठरते. ॲट्रियल फिब्रिलेशन ही एक अनियमित आणि अनेकदा अतिशय जलद हृदयाची लय आहे (अरिदमिया) ज्यामुळे हृदयात रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात. वॉचमन एफएलएक्स डाव्या अॅट्रियल अॅपेंडेजला कायमचे बंद करण्यासाठी डिझाइन केले आहे, ज्यामुळे ओपन हार्ट सर्जरीची आवश्यकता न भासता स्ट्रोकचा धोका कमी होतो. ही प्रक्रिया १ तासाच्या आत सुरक्षितपणे पूर्ण झाली, कोणत्याही गुंतागुंतीशिवाय, रुग्ण आता पूर्णपणे बरा होत असल्याची माहिती डॉ. अनुप महाजनी यांनी दिली
*डॉ. अनुप महाजनी पुढे सांगतात की,* पारंपारिक ओपन हार्ट सर्जरीच्या तुलनेत यामध्ये कोणत्याही मोठ्या जखमा होत नाहीत, रुग्ण जलद बरा होतो आणि संसर्ग किंवा गुंतागुंतीचा धोका देखील कमी असतो. हे विशेषतः वयस्कर किंवा कोमॅार्बिडीटिज असलेल्या रुग्णांसाठी योग्य ठरतात. या ४ दिवसांच्या प्रक्रियेनंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे प्रगत उपचार पुरविले जातात. नवी मुंबईत पहिल्यांदाच वॉचमन FLX डिव्हाइस इम्प्लांटेशन यशस्वीरित्या पार पडले असून हृदयरोगाच्या काळजीसाठी हे एक नवीन बेंचमार्क प्रस्थापित करते. पारंपारिक रक्त पातळ करणाऱ्या उपचारांना सहन न करणाऱ्या असंख्य रुग्णांकरिता हे एक आशेचा किरण ठरत आहे. स्ट्रोक टाळण्यासाठी हा एक सुरक्षित आणि अधिक प्रभावी पर्याय ठरत आहे.