आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा रायगड जिल्हा दौरा

आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा रायगड जिल्हा दौरा





उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे सचिव तथा कोकण विभागाचे प्रभारी मा.श्री. यू.बी. व्यंकटेशजी हे गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी प्रथमच रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचात निवडणुकां संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यांचे समवेत मा. राजेश शर्मा (निरीक्षक रायगड तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) मा. राणीताई अग्रवाल मॅडम, (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा सहप्रभारी रायगड), मा. श्री श्रीरंग बर्गे, (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तथा सहप्रभारी रायगड) हे उपस्थित राहणार असून त्या साठी गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जोमा नारायण घरत समाजमंदिर शेलघर येथे जिल्हा काँग्रेस कमिटी ची अत्यंत महत्वाची बैठक बोलविण्यात आली असून ब्लॉक / शहर अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक पदाधिकारी, फ्रंटल ऑर्गनायझेशन पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत यांचे आजी/ माजी सदस्य, रायगड जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी तसेच इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे.