दम्यासंबंधीत गैरसमजूती दूर करुन त्यामागची वास्तविकता जाणून घेणे गरजेचे-डॉ शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर,नवी मुंबई

 जागतिक दमा दिन


दम्यासंबंधीत गैरसमजूती दूर करुन त्यामागची वास्तविकता जाणून घेणे गरजेचे-डॉ शाहिद पटेल, फुफ्फुसविकार तज्ज्ञ, मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर,नवी मुंबई

नवी मुंबई/प्रतिनिधी-

दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिन म्हणून पाळला जातो. सध्या जगभरात दम्याचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. जागतिक दमा दिन हा संपूर्ण जगात दम्याबाबत जनजागृती करण्यासाठी, लोकांमध्ये या आजाराच्या उपचारांविषयी माहिती पोहोचवण्यासाठी, आणि दमा झालेल्या व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात दम्याचा परिणाम कमी करण्यास मदत करण्यासाठी साजरा केला जातो.

*दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती*

 *गैरसमज १- दमा हा केवळ लहान मुलांमधील आजार आहे*

वास्तविकता: दमा बहुतेकदा बालपणात सुरू होतो, परंतु तो कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो. प्रौढांमध्ये होणारा दमा हा सामान्यपणे आढळून येतो आणि त्यासाठी विशेष खबरदारी नियमित फॅालोअपची आवश्यकता आहे.

*गैरसमज २ : सततच्या दम्याच्या औषधांचे एखाद्याला व्यसन लागू शकते*

वास्तविकता: इनहेलर आणि इतर दम्याची औषधं ही व्यसन निर्माण करणारी नसतात. लक्षणे नियंत्रित करण्यासाठी आणि गुंतागुंत रोखण्यासाठी त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. भीतीपोटी त्यांना टाळल्याने गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

*गैरसमज ३: दमा असलेल्या लोकांनी व्यायाम टाळावा*

वास्तविकता: योग्य व्यवस्थापनाने, दमा असलेल्या व्यक्ती देखील सक्रिय जीवनशैलीचे पालन करु शकतात आणि खेळांमध्येही उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात. खरं तर, नियमित व्यायामामुळे फुफ्फुसांचे कार्य आणि एकूणच आरोग्य सुधारते.

*गैरसमज ४: इनहेलर फुफ्फुसांना कमकुवत करतात*

वास्तविकता : इनहेलर थेट फुफ्फुसांमध्ये औषधं पोहोचविण्याचे काम करतात, दुष्परिणाम कमी करतात आणि सूज कमी करतात, ज्यामुळे फुफ्फुसांचे संरक्षण केले जाते.

*गैरसमज ५: दमा स्वतःहून निघून जातो*

वास्तविकता : दमा हा एक जुनाट आजार आहे. योग्य व्यवस्थापनाने लक्षणं कमी होऊ शकतात, परंतु लक्षणांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

*गैरसमज ६: दररोज इनहेलर वापरणे म्हणजे दम्याचे स्वरुप गंभीर आहे*

वास्तविकता : इनहेलरचा दररोज वापर हा दमा नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. लक्षणं अधिक तीव्र होऊ नये याकरिता इनहेलरची मदत होते तसेच त्यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळता येते. 

*गैरसमज ७: जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा तुम्ही दम्याची औषधांचे सेवन थांबवू शकता*

वास्तविकता : वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन थांबविल्याने लक्षणे अचानक बिघडू शकतात किंवा त्यांची तीव्रता वाढु शकते. उपचारांमध्ये बदल करण्यापूर्वी नेहमी पल्मोनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

दमा हा काही एखाद्या व्यक्तीमधील कमकुवतपणा नाही तसेचती काही  लाजिरवाणी बाब नाही. मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये आम्ही अशा रुग्णांवर यशस्वी उपचार करुन त्यांची पुरेपुर काळजी घेण्याचा प्रयत्न करतो.

या जागतिक दमा दिनानिमित्त, दम्याविषयी असलेल्या गैरसमजूती आणि भीतीला अचुन ज्ञानाने दूर करण्याचा संकल्प करूया. जर तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना दम्याची लक्षणे दिसून आली, जसे की घरघर, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे किंवा छातीत जडपणा तर  विलंब न करता त्वरित तज्ञांचा सल्ला घ्या. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसह, दम्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले जाऊ शकते.