पंतप्रधान मोदीजींच्यामुळे देशाच्या विकासाला गती मीळाली आहे-आ.प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे खंबीर नेतृत्व आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे प्रगतशील सरकार असल्यामुळे विकासाला एक नवी दिशा आणि नवी गती मिळाली आहे. या विकासप्रवाहात आपली पनवेल महानगरपालिका अग्रस्थानी असावी, या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून पनवेल महानगरपालिकेमार्फत विशेष प्रकल्प राबविले जात आहेत. "माझं शहर माझा अजेंडा" या उपक्रमाद्वारे हजारो लोकांनी आम्हाला विकासकामांच्या बाबतीत ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे जाहीरनामा "संकल्प" बनविले आहे. पुन्हा एकदा पनवेल महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी व महायुतीची सत्ता आल्यानंतर केंद्र व राज्य शासनाचा भरघोस निधी उपलब्ध करून पनवेल महानगरपालिकेला एक आदर्श, प्रगत आणि स्मार्ट महानगरपालिका म्हणून देशात वेगळी ओळख निर्माण करू, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पनवेलकर जनतेला आश्वासित केले.
