परेशशेठ ठाकूर यांच्या पुढाकारातून रायगड जिल्हा आणि कोकणात कुस्तीला वैभव मिळणार- केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ
पुरुष कुस्तीत रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. वि जय चौधरी, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, उपमहाराष् ट्र केसरी पै. किरण भगत
तर महिला कुस्तीत पै.अमेघा घरत, पै. सुष्टी भोसले ठरले किताबाचे मानकरी
पनवेल (हरेश साठे) रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात कुस्तीसाठी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे आता रायगड जिल्हा आणि कोकणातही कुस्तीला वैभव मिळणार आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामोठे येथे केले.
महाराष्ट्राच्या मातीतून जन् मलेली आणि राज्याच्या परंपरेशी नाळ जुळवणारी कुस्ती केवळ खेळ नसून, शौर्य, परंपरा आणि संस्कृ तीचे प्रतीक आहे. याच परंपरेला पुन्हा उजाळा
देत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवकांचे प्रेरणास्था न परेश ठाकूर यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने “मा.श्री.परेशशेठ ठाकूर के सरी” भव्य कुस्ती स्पर्धा कामोठे येथील सेक्टर ६ मधील लोकनेते रामशेठ ठाकूर वि द्यालयाच्या भव्य मैदानात लाल मातीवर व दर्जेदार आयोजनात पार पडली. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नामदार मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांची उपस्थिती लाभली. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि,रायगड जिल्ह्यात कबड्डीपेक्षा कुस्ती कमी प्रमाणात खेळली जाते पण या स्पर्धेच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार होत आहे. परेश ठाकूर हे जिल्ह्याचे नेतृत्व करत असल्याने आता कुस्तीला चांगले दिवस येऊन या ठिकाणी खूप चांगले मल्ल घडतील, अशी अपेक्षा नामदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. त्यांनी पुढे बोलताना कुस्ती रसिकांची मोठी उपस्थिती व आयोजनाबद्दल भरभरून कौतुक केले. फक्त पुढच्या वर्षी जेव्हा स्पर्धा घ्याल तेव्हा यापेक्षाही मोठे मैदान बघा कारण आज हि जागा या उत्तम स्पर्धेसाठी कमी पडली आहे, अशा शब्दात त्यांनी स्पर्धेचे कौतुक केले. ट्रिपल महाराष्ट्र विजय चौधरी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे असे महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटू एकाच मैदानात बघायला कमी मिळतात पण ते या स्पर्धेतून शक्य झाले आहे. त्यामुळे मनापासून मी सर्वांचे अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या कुस्तीचा देशात नावलौकिक आहे. ऑलिम्पिक मधील पहिले पदक महाराष्ट्रातील खाशाबा जाधव यांनी कुस्तीत मिळवून दिले आणि देशाचे पहिले व्यक्तिगत स्वरूपात ते पदक होते. अशाच प्रकारे महाराष्ट्राने देशाला नामवंत खेळाडू दिले आहेत, त्यात अनेक अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू, भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू दिले असल्याचे सांगून अशा स्पर्धांच्या माध्यमातून पुढच्या काळात परेशशेठ यांच्या नेतृत्वाखाली या रायगड कोकणातून महाराष्ट्र आणि देशाला चांगले खेळाडू मिळतील अशी अपेक्षाही नामदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त करत वाढदिवसानिमित्त माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे अभिष्टचिंतन केले.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, हिंद केसरी योगेश दोडके, संदीप बोंडवे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, हरचरणसिंग सग्गु, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक जयंत पगडे, अनिल भगत, गणेश कडू, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, विजय चिपळेकर, स्पर्धा संयोजक अल्पसंख्यांक आयोगाचे प्रदेश सदस्य हॅप्पी सिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पै. रुपेश पावशे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, बळीराम पाटील, संजय भगत,योगेश लहाने, अनेश ढवळे, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आतंरराष्ट्रीय दर्जाचे मैदान, उत्तम आणि दिमाखदार नियोजन, आकर्षक रोषणाई, हलगीचा ताल, मर्दानी आवाजात सूत्रसंचालन आणि हजारो कुस्ती रसिकांच्या उपस्थितीत राज्य, राष्ट्रीय दिग्गज व
नामवंत कुस्तीपटूंचे मुख्य व रोमहर्षक सामने झाले. त्याचबरोबरीने स्थानिक, जिल्हा आणि महाराष्ट्रातील इतर पैलवानांची वयोगटानुसार गटनिहाय सामने मोठ्या उत्साहात झाले.
- मुख्य स्पर्धा-
पुरुष कुस्ती -
रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख
ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. वि
डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवरा
उपमहाराष्ट्र केसरी पै. किरण भगत विरुद्ध हिं
महिला कुस्ती -
पै.अमेघा घरत विरूध्द पै. सुमन शर्मा = पै. अमेघा घरत विजयी
पै. सुष्टी भोसले विरूध्द पै. सोनिया तोमर = पै. सृष्टी भोसले विजयी