जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
मुंबई(प्रतिनिधी)-प्रसिद्ध चित्रकार बापूराव महाजन आणि पुरातत्वज्ञ श्रीधर तांबटकर तसेच रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील सुप्रसिद्ध अशा जहांगीर आर्ट गॅलरीत २८ एप्रिल ते ४ मे या कालावधीत संपन्न झाले.या प्रदर्शनाचे उद्घाटन नवीन पनवेल येथील के.आं.बांठिया महाविद्यालय आणि एन.एन.पालीवाला ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय बी.एस.माळी यांच्या शुभहस्ते झाले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे विभागप्रमुख प्राध्यापक डॉ.गणेश तरतरे व प्राध्यापक अशोक आंबरे उपस्थित होते.
या अगोदर या सुप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन मॉरिशस येथे भरवीले गेले असून जहांगीर आर्ट गॅलरीत सुद्धा ते दुसऱ्यांदा भरविण्यात आले.प्रदर्शनाच्या ७ दिवसांच्या काळात शेकडो चाहत्यांनी येथे भेट दीली आणि अनेक चित्रांची खरेदी केली.
या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी श्री.नवनाथ साबळे साहेब गट शिक्षणाधिकारी, मा.श्री.तिरमले सर उपप्राचार्य व मा.श्री.युसुफ शेख,सौ.सुनंदा महाजन,सौ.अलका तांबटकर,श्री.मुकेश महाजन,श्री. यशोदीप महाजन व कु.आकांक्षा तांबटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.