माजी आमदार बाळाराम पाटील लढले, पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

 माजी आमदार बाळाराम पाटील लढले, पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले




पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला. 
         बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पहिल्या फेरीत बाळाराम पाटील यांनी ३ हजार ६१२ मतांनी आघाडी घेतल्याने बाळाराम पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर होती. बाळाराम पाटील यांची ही आघाडी पाच फेऱ्या पर्यंत टिकवण्यात त्यांना यश मिळाले. दुसऱ्या फेरीत ७ हजार ८३६ मताची त्यांनी आघाडी मिळवली, तिसऱ्या फेरीत बाळाराम पाटील यांची ही आघाडी काहीशी कमी होताना दिसून आली. तिसऱ्या फेरीत त्यांनी ६,२३१ मतांची आघाडी मिळवली त्या नंतर चौथ्या फेरीत त्यांनी पुन्हा ६ हजार ९७१ मताची आघाडी घेत आघाडी कायम ठेवली आहे. मात्र ही आघाडी पाचव्या फेरीत ६५४ वर आली.
         माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या सोबत दुसऱ्या फळीतील तरुणांची फौज रस्त्यावर उतरून प्रचार यंत्रणा हातात घेऊन गावोगावी शिट्टी ही निशाणी पोहोचण्यात मग्न होती. पनवेल मधील अनेक समस्यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. अर्धवट केलेली विकास कामे, नैना प्रश्न, मालमत्ता कर यावर लक्ष दिले. मात्र बाळाराम पाटील यांना पराभव पत्करावा लागला. हार न मानता आपल्यावर ज्या 1 लाख 32  हजार 840 मतदारांनी विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी त्याच सर्व तरुण कार्यकर्त्यांची फौज घेऊन बाळाराम पाटील यांनी पुन्हा जोमाने काम करण्याचे ठरवले आहे.

Popular posts
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये एल.एल.बी,आणि एल.एल.एम च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये जागतिक मुदतपूर्व प्रसूती (प्रिमॅच्युअर) दिन उत्साहात साजरा
Image