जे एम म्हात्रेंना ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा!-"पक्षप्रवेशाची तारीख दोन दिवस पुढे....!!
पनवेल (प्रतिनिधी)दि.६- शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही त्याबद्दल जाहीर पक्षाच्या मिटिंग मध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेलचे मा. नगराध्यक्ष श्री जे एम म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
5 मे रोजी सकाळी कार्यकर्त्यांशी चर्चा करून श्री. जे एम म्हात्रे यांनी भाजप प्रवेश करण्याचे निश्चित केले. त्यानुसार सायंकाळी भरगच्च पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दोन दिवसात म्हणजे 7 तारखेला भाजपा पक्ष प्रवेश करणार असे जाहीर केले. यानंतर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत,आमच्या विभागातील बरेच कार्यकर्ते आपल्या सोबत भाजपा प्रवेशासाठी इच्छुक आहेत परंतु एक दिवसात सर्वांपर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही. पनवेल, उरण , खालापूर मधील सर्व कार्यकर्ते आणि मित्र परिवाराशी संवाद साधणे गरजेचे आहे असे कार्यकर्त्यांनी सांगितले.
आज तरुण पिढीच जास्त व्हाट्सअप वापरत आहे परंतु ग्रामीण भागातील भाऊंच्या सोबत काम करणारे जे जुने ज्येष्ठ सहकारी आहेत ते सर्वच व्हाट्सअप वापरत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधून त्या सर्वांना सोबत घेऊन ग्रामपंचायत सदस्या पासून ते नगरसेवकांपर्यंत मोठ्या प्रमाणात सर्वांना घेऊन पक्षप्रवेश करणार आहोत असे श्री.जे एम म्हात्रे साहेब यांच्याकडून सांगण्यात आले.
*कोट*
ग्रामीण भागातील बरीचशी माझी मंडळी माझ्याशी संपर्क करत आहेत, प्रत्यक्ष भेटत आहेत त्यामुळे मी पुढील दोन दिवसात पनवेल, उरण , खालापूर मधील माझ्या सर्व कार्यकर्ते आणि मित्र परिवाराशी संवाद साधून त्या सर्वांना घेऊनच पुढील 2 दिवसात भाजपामध्ये निश्चित पक्षप्रवेश करणार आहे.
*जे एम म्हात्रे*
मा. नगराध्यक्ष
पनवेल नगरपरिषद