पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा- आमदार प्रशांत ठाकूर

पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा- आमदार प्रशांत ठाकूर 





पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सध्या सुरू आहे. त्याला अनुसरून पनवेल तालुक्यातील नेरे मंडल अध्यक्षपदी भूपेंद्र पाटील, तळोजा मंडल अध्यक्षपदी दिनेश खानावकर, नवीन पनवेल मंडल अध्यक्षपदी दशरथ म्हात्रे, खारघर मंडल अध्यक्षपदी प्रवीण पाटील, 
पनवेल शहर मंडल अध्यक्षपदी सुमित झुंझारराव, कळंबोली मंडल अध्यक्षपदी अमर पाटील, कामोठे मंडल अध्यक्षपदी विकास घरत तसेच उरण विधानसभा मतदार संघातील उलवे मंडल अध्यक्षपदी रुपेश धुमाळ, कर्नाळा  मंडल अध्यक्षपदी मंगेश वाकडीकर यांची नियुक्ती  करण्यात आली असून त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देत पक्ष संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडा, असे आवाहन केले. 
         यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, भारतीय जनता पार्टी सध्या संपूर्ण देशभरात पक्ष संघटनात्मक बळकटीसाठी मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या करत आहे. ही प्रक्रिया विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुरू आहे. त्याप्रमाणे भाजपने मंडल आणि जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी वयमर्यादा निश्चित केली आहे. मंडल अध्यक्षांसाठी वयमर्यादा ३५ ते ४५ वर्षे, तर जिल्हाध्यक्षांसाठी ४५ ते ६० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही पावले पक्षात तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी उचलण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने तालुका मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्ष संघटनेला बळ देण्याचे काम केले आहे. काल राज्यात एकाच वेळेला आठशेपेक्षा जास्त मंडल अध्यक्षाची नियुक्ती झाली आहे. हि सर्व तरुण टीम जोडली गेली आहे. आपला पक्ष अधिकाधिक ताकदवान होत चालला आहे. नवनियुक्त तालुका मंडल अध्यक्षांवर त्या-त्या मंडलाची जबाबदारी आहे, आणि पक्ष संघटनेच्या दृष्टिकोनातून ते जबाबदारीने काम करतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त करत संघटनेने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्यासाठी नियोजनबद्ध काम करा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, माजी उपमहापौर सीता पाटील, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, माजी नगरसेवक नरेश गायकवाड, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, कळंबोली माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, विजय पाटील, कृष्णा पाटील, सतिश पाटील, प्रकाश खैरे, रुपेश नागवेकर, केदार भगत, किशोर चौतमल, रोनक शेट्ये, प्रशांत शेट्ये, भीमराव पोवार, प्रवीण मोरबाळे, संदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image