गौरव जहागीरदार यांची माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या पनवेल तालुका प्रचार प्रमुख पदी नियुक्ती..
पनवेल (4K News) भारतीय लोकशाहिने दिलेला माहिती अधिकार अधिनियम २००५ कायदा जनहितासाठी वापर करावा तसेच जनजागृती करावी, तसेच सर्व सामान्य नागरिकांमध्ये व समाजामध्ये माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार करावा या साठी कार्य करणारी संघटना म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ या नोंदणीकृत संस्थे तर्फे 4K डिजिटल चॅनल चे संपादक गौरव जहागीरदार यांची पनवेल तालुका प्रचार प्रमुख म्हणून नियुती करण्यात आली. अशी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात आली.
या बद्दल गौरव जहागीरदार यांनी अधिकार कार्यकर्ता महासंघचे अध्यक्ष श्री सुभाष बसवेकर यांचे आभार मानले, व आपण माहिती अधिकार अधिनियम २००५ चा प्रसार व प्रचार जनहितासाठी योग्य करू असे सांगितले.