पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात प्रथम तर कोकण विभागात सहावा क्रमांक

 पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात प्रथम तर कोकण विभागात सहावा क्रमांक 


 पनवेल : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प 2023 - 24 या वर्षाच्या क्रमवारीत राज्यातून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती १११ व्या क्रमांकावर आली असून कोकण विभागात सहावा क्रमांक तर रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आली आहे. 
         राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत बाजार समिती यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी 2021- 22 पासून पणन संचालनालया मार्फत प्रसिद्ध करण्यात येते. राज्यातील 305 बाजार समितीची 2023 - 2024 या वर्षाची वार्षिक क्रमवारी पणन संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या द्वारे जाहीर करण्यात आली. या गुणांकनात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा, आर्थिक निकष, वैधानिक कामकाज, इतर निकषांमध्ये चांगले गुण प्राप्त झाले आहेत. भविष्यात बाजार समित्यांसमोर मोठी स्पर्धा व आव्हाने उभे राहणार आहेत. आव्हाने व स्पर्धा लक्षात घेता समितीच्या कामकाजात आणखी काय सुधारणा करता येईल याबाबत संचालक मंडळ विचार करत आहे. या क्रमांकामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. 

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image