भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेलमध्ये भीम जयंती महोत्सव साजरा
प्रख्यात गायक आनंद शिंदे, विशाल - साजन जोडीच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल सेक्टर २ येथे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच मागासवर्गीय समाजाचे नेते ॲड. प्रकाश बिनेदार यांच्यावतीने भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.यावेळी महोत्सवाला पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचे काम ॲड. प्रकाश बिनेदार आणि सहकारी करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी करत तमाम जनेतला त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात प्रकाश बिनेदार यांच्यावतीने सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. या महोत्सवात प्रख्यात गायक आनंद शिंदे यांच्या गाण्याचा मनमुराद आनंद पनवेल वासियांना लाभला. या भीम महोत्सवाची सुरुवात धर्मगुरू गौतम बुद्ध, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पसुमनाने पूजन करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी महापौर डॉ. कविता चौतमल, माजी नगरसेवक राजू सोनी, तेजस कांडपिले, जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदीश घरत, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका ॲड. वृषाली वाघमारे, ॲड. जितेंद्र वाघमारे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शिवसेना शिंदे गटाचे पनवेल तालुकाध्यक्ष रुपेश ठोंबरे, अतुल मोकल आदींसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.