जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने के.एल.ई.महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम


जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने के.एल.ई.महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम


पनवेल, दि.२२ :

पनवेल महानगरपालिका आणि के.एल.ई. महाविद्यालय, कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्त श्री. मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने जागतिक वसुंधरा दिन म्हणजे दिनांक 22 एप्रिल2025 ते महाराष्ट्र दिन 1 मे 2025 या कालावधीत विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे यांच्या सूचनेनूसार हा कार्यक्रम घेण्यात आला.  या कार्यक्रमास महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार, प्राचार्य डॉ.विजय डी. मेंढुलकर ,एनएसएस कार्यक्रम अधिकारी शितल घारगे, प्रा. डॉ.अर्चना नारनीया, प्रा. श्रध्दा कारवा,  प्रा. हेमांगी म्हाळगी, उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण कार्यक्रमांर्तगत विविध जातीची झाडे लावण्यात आली.

श्री. पवार यांनी पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण सर्वांनी मिळून हवामान बदलावर उपाय शोधणे अत्यंत आवश्यक आहे. प्लास्टिकचा वापर कमी करुन झाडे लावा व त्यांचे जतन करा. पाण्याची बचत करा आणि शक्य तेथे ऊर्जा वापर कमी करा. पर्यावरणाचे रक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के.एल.ई. कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय डी. मेंढुलकर हे होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंबंधी जागरूक राहण्याचे व सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

महापालिकेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान 5.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी विविध उपक्रम उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या सूचनेनूसार राबविले जात आहे.  या अंतर्गत माझी वसुंधरा अभियानातील आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या महत्वाच्या घटकांनूसार महापालिका कार्यक्षेत्रातील महाविद्यालामध्ये, विद्यालयांमध्ये पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा,परिसंवाद, वृक्षारोपण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे .

Popular posts
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती साजरी
Image
उरण तालुक्यात शेकापक्षाला पुन्हा नवी उभारी येणार.-पक्षाच्या उरण तालुका चिटणीस पदावर कामगार नेते रवि घरत यांची नियुक्ती
Image
पनवेल महानगरपालिका विद्युत विभाग प्रमुख प्रितम पाटील यांच्या तत्परतेने पेंधर येथील मोठी दुर्घटना टळली
Image
तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची उद्योगमंत्र्यांकडे रासायनिक व मत्स्यप्रक्रिया उद्योगांचे स्थलांतर करण्याची मागणी
Image
जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रकार बी.महाजन,एस.तांबटकर व रसिका महाजन यांच्या चित्रांचे प्रदर्शन संपन्न
Image