पनवेल अवयव प्रत्यारोपणासाठी 'हब' व्हावे- सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर

 पनवेल अवयव प्रत्यारोपणासाठी 'हब' व्हावे- सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर



पनवेल(प्रतिनिधी) शहरातील नागरिकांसाठी आता आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि सर्वसमावेशक होणार आहेत. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि धनवंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅबची नुकतीच सुरूवात झाली आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी या दोन्ही आरोग्य सुविधांचे उदघाटन केले. याप्रसंगी लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 
          यावेळी बोलताना आरोग्य मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, केंद्र आणि राज्य सरकार चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करत आहे आणि जवादे कुटुंबीय देखील आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत, हे कौतुकास्पद आहे. त्यांनी पनवेल शहरात सुरु झालेल्या या आधुनिक आरोग्य सुविधांचे अभिनंदन केले. तसेच, पनवेल हे अवयव प्रत्यारोपणासाठी 'हब' व्हावे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
          आमदार प्रशांत ठाकूर यांनीही जवादे कुटुंबियांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमुळे परिसरातील रुग्णांना एकाच ठिकाणी विविध विशेषज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि आधुनिक निदान सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे ते म्हणाले. डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकमध्ये ऑर्थोपेडिक्स, युरोलॉजी, नेफ्रोलॉजी, गायनेकोलॉजी, बालरोग, कार्डिओलॉजी, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन क्लिनिक यांसारख्या अनेक विशेषज्ञ विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर नियमितपणे उपलब्ध असणार आहे. तसेच धनवंतरी डायग्नोस्टिक्सच्या अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅबमध्ये विविध तपासण्यांसोबतच हिस्टोपॅथोलॉजी आणि सायटोलॉजीसारख्या विशेष निदान सेवा देखील उपलब्ध असणार आहेत. डॉक्टर कैलास जवादे आणि डॉक्टर वैशाली जवादे यांच्या प्रयत्नातून एकाच ठिकाणी मल्टीस्पेशालिटी क्लिनिक आणि अत्याधुनिक पॅथोलॉजी लॅब सुरू झाल्यामुळे पनवेल आणि आसपासच्या नागरिकांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.  या उदघाटन सोहळ्याला माजी नगरसेवक राजू सोनी, माजी मुख्याध्यापक गोपीकिशन सिखवाल, प्रभाकर वाघीकर, हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर गोपाल जवादे, सुभाष देशमुख,बाधकांम व्यावसायिक मिलिंद पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
पनवेल महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा अभियान 3.0’ अंतर्गत मिळालेल्या राज्यस्तरीय पारितोषिकातून सौर-ट्री प्रकल्पांना गती
Image
हाय टेन्शन तार तुटून पनवेल पंचशील नगर झोपडपट्टीत आग भडकली अनेक झोपड्या जळून खाक; प्रशासनाचा तत्पर हस्तक्षेप
Image