थोर समाजसुधारक स्व. जनार्दन
सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायतीला १ लाख रुपये बक्षीस
पनवेल(प्रतिनिधी) कष्टकऱ्यांचे द्रष्ट नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत पनवेल तालुकास्तरीय "स्व. जनार्दन भगत स्वच्छ ग्रामपंचायत पुरस्का र स्पर्धा २०२५" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जनार्दन भगत साहेबांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अफाट राहिले आहे. त्यांनी अहोरात्र जनतेची सेवा केली. फक्त राजकारण नाही तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. आयुष्यापेक्षा ध्येय्य मोठे असले पाहिजे, ही शिकवण त्यांनी समाजामध्ये रुजवली. या भागाचे ते देवदूत होते. त्या अनुषंगाने स्व. जनार्दन भगत साहेबांच्या नावाने स्वच्छ ग्रामपंचायत पु रस्कार या वर्षीही देण्यात येणार आहे. त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतींचे स् वच्छतेच्या निकषावर सर्वेक्षण येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास १ लाख रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकाला ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकाला २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह तसेच दोन उत्तेजनार्थ ग्रामपंचायतींना प्रत्येकी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन ०७ मे रोजी उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर मैदान येथे होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे.