हनुमान कोळीवाडा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.

 हनुमान कोळीवाडा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.




उरण दि ६(विठ्ठल ममताबादे )समस्त हिंदूचे आराध्य दैवत असलेले भगवान प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव उरण तालुक्यातील विविध भागात, गावोगावी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे यंदाही उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा येथे गावाचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव मोठया उत्साहात संपन्न झाले.हनुमान कोळीवाडा मधील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, आरती, महाप्रसाद, मान्यवरांचे स्वागत व सत्कार, पालखी मिरवणूक सोहळा आदी कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी भाविक भक्तांनी प्रभू श्रीरामाचे मोठया प्रमाणात दर्शन घेतले. सर्व भाविक भक्तांनी रांगेत उभे राहून शिस्तीने दर्शन घेतले. सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेवा कोळीवाडा सामाजिक ग्रामविकास मंडळ, ग्रामस्थ हनुमान कोळीवाडा, शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना, महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रेडिशनल फिश वर्कर्स युनियन, पारंपारिक मच्छिमार सामाजिक बचाव व कृती समिती, सामूहिक वन हक्क समिती शेवा कोळीवाडा, श्री हनुमान कोळीवाडा मच्छिमार विकास संस्था मर्यादित आदी संस्था संघटनेचे पदाधिकारी सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली. एकंदरीत हनुमान कोळीवाडा गावात श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाले.

Popular posts
ठाणे आणि विटावा परिसरात "जनसभा" दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आणि वितरण
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
८०० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बाळाची मृत्यूशी झुंज यशस्वी-नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
Image
यूथ महाराष्ट्र संपादिका दिपालीताई पारसकर यांचा वाढदिवस साजरा – सामाजिक उपक्रमातून अनोखा आदर्श
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image