क्रिकेट सामन्यांना शेकाप नेते प्रीतम जे.एम म्हात्रे यांची उपस्थिती

 क्रिकेट सामन्यांना शेकाप नेते प्रीतम जे.एम म्हात्रे यांची उपस्थिती




पनवेल : मंगेश पाटील यांच्या माध्यमातून जे.डी.एम. चॅलेंजर ४०+ यांच्या व्यवस्थापनाखाली  छत्रपती शिवाजी महाराज मैदान बेलवली येथे प्रकाश झोतातील मर्यादित घटकांचे भव्य टेनिस क्रिकेटचे सामने आयोजित केले होते तसेच आदिवासी तरूण मित्र मंडळ, यांच्या तर्फे कै. सावळाराम पाटील क्रीडा नगरी, कसळखंड-आष्टे या ठिकाणी भव्य क्रिकेट सामन्यांच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रीतम जे एम म्हात्रे उपस्थित होते.
    मालिकावीर , उत्कृष्ट  फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक,रायजिंग प्लेयर अशी अनेक प्रकारची बक्षिसे ठेवण्यात आली होती जेणेकरून खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. उत्कृष्ट धावपट्टी आणि यशस्वी आयोजन यामुळे दोन्ही ठिकाणी क्रीडा रसिकांची त्यातही युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा देऊन चांगल्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले.
      यावेळी शेकाप नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांच्यासोबत श्री. भगीरथ चोरघे, श्री. रोहित मोरे, श्री. प्रशांत मोरे, श्री. शिवराज साखरे, श्री. दर्शन करडीले, कु. रोहित घरत, श्री. राजू नारायण पाटील, श्री. जीवन राघो पाटील, श्री. रुपेश बाळाराम पाटील, श्री. चंद्रकांत जाणू चोरघे, श्री. सदानंद गणेश चोरघे, श्री. मंगेश बाळाराम पाटील, श्री. आकाश विलास पवार, श्री. सुनाद पंढरीनाथ पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image