माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ वी ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण

माजी सैनिकाने तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ४८ व्या वर्षी आपल्या मुली सोबत दिली १२ वी ची परिक्षा आणि दोघांना मिळाले सारखेच गुण



पनवेल(प्रतिनिधी)किरण अर्जुन गोरे हे माजी सैनिक असून सध्या महसूल विभागात तहसीलदार कार्यालय पेण येथे महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. सन १९९३ साली १० वी पास झाल्यानंतर आय टी आय ला प्रवेश घेतला तीन वर्ष आय टी आय च प्रशिक्षण पूर्ण करून लगेचच सन १९९६ साली आर्मी मध्ये भरती झाले. आणि सन २०१३ साली १६ वर्ष  देशाची सेवा करुन आर्मी मधून रिटायर झाले. आणि नंतर महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा विभागाची परीक्षा देऊन महसूल विभागात रुजू झाले. या दरम्यान त्यांचे १० वी नंतरचे पुढील शिक्षण घेणे राहुन गेले. 

आपल अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या १२ सायन्स मध्ये शिकत असलेल्या मुली सोबत परीक्षा द्यायची ठरवल आणि वावोशी हायस्कूल ता. खालापूर ह्या आपल्याच शाळेतून कला शाखेतून १७ नंबरचा (बाहेरून) फॉर्म भरून परीक्षा दिली. परीक्षेच्या वेळेस दिवस रात्र विधानसभा निवडणुकीचे काम आणि इतर सर्व जबाबदारी सांभाळुन जिद्दीने अभ्यास केला आणि परीक्षेत ७५% गुण मिळवून वावोशी हायस्कूल ता. खालापूर मध्ये शाळेत पहिला नंबर काढला. एका माजी सैनिकाने वयाच्या ४८ व्या वर्षी घवघवीत यश मिळवून आपल अर्धवट राहिलेले   शिक्षण सुरू केल. तसेच त्यांच्या मुलीला सुद्धा सायन्स मध्ये ७५% गुण मिळाले आहेत. मुलगी आणि वडील दोघांनी सारखेच गुण मिळवून यश संपादन केल्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि समाजामधे आणि महसूल प्रशासना मध्ये विशेष कौतुक केले जात आहे. ह्या मिळविल्या यशाबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. ह्या यशामध्ये त्यांना शाळेचे शिक्षक कुटुंब, आणि मित्रांची चांगली साथ मिळाली अस त्यांनी सांगितलं.

Popular posts
नेरुळ–उरण लोकल १२ डब्यांची करावी तसेच फेऱ्या वाढवाव्यात —प्रितम म्हात्रे यांचा पाठपुरावा
Image
नविन पनवेल मधील जुन्या रस्त्यांची रुंदी वाढवून इमारत आराखडयास पुर्नबांधणी परवानगी देण्याची मा.नगरसेवक ऍड मनोज भुजबळ यांची मागणी
Image
खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये स्ट्रोक युनिटला शुभारंभ - मुंबई, पनवेल आणि आसपासच्या शहरातील रुग्णांना घेता येणार सुविधेचा लाभ
Image
पनवेल युवा दिपावली अंक उत्कृष्ट आणि वाचनीय -- लोकनेते रामशेठ ठाकूर
Image
काँग्रेसच्या महिला रायगड जिल्हाध्यक्ष पदी रेखा घरत यांची नियुक्ती-सर्वच स्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.
Image