भगवान महावीर जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जैन धर्मीयांना शुभेच्छा

भगवान महावीर जयंतीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जैन धर्मीयांना शुभेच्छा 



पनवेल (प्रतिनिधी) आज संपूर्ण देशात भगवान महावीर स्वामी जयंती मोठ्या श्रद्धेने साजरी होत आहे. या पवित्र दिनानिमित्त लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी जैन समाजातील बांधवांना शुभेच्छा दिल्या."अहिंसा परमो धर्म:" आणि "जिओ और जिने दो" या तत्वज्ञानाचा अवलंब करत जगाला समता, करुणा व शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचे विचार आजही तितकेच मार्गदर्शक ठरत आहेत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात सांगितले.

       भगवान महावीर जयंतीनिमित्त पनवेलमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत आमदार प्रशांत ठाकूर यांनीही सहभाग घेतला आणि नागरिकांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय जैन, नितीन मुनोथ, राजेश बांठिया, किरण परमार, चतुरमल मेहता यांच्यासह समाजातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

 


Popular posts
आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने सिडकोच्या "माझ्या पसंतीचे घर" योजनेतील हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न!
Image
कळंबोली वहातुक शाखेकडून वाहन चालकांचे प्रबोधन
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती होताच शिवसैनिकांमध्ये उत्साह
Image
खारघर सेक्टर २० शहा किंग्डम येथील बांधकाम व्यावसायिकाकडून होत असलेल्या वायु व ध्वनी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका करावी-सौ.नेत्रा पाटील
Image
गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या खांद्याच्या वेदनेपासून तिला मिळाला आराम;खारघरच्या मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये ६५ वर्षीय महिलेवर यशस्वी उपचार - दुर्बीणीद्वारे केली खांद्यांवर शस्त्रक्रिया
Image