पत्रकार तथा समाजसेविका रुपालताई शिंदे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा "पनवेल नारिशक्ती" पुरस्कार जाहीर


पत्रकार तथा समाजसेविका रुपालताई शिंदे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा "पनवेल नारिशक्ती" पुरस्कार जाहीर 



पनवेल / प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई रायगड जिल्हा

आयोजित पनवेल तालुका प्रथम वर्धापनदिना निमित्त गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शासकीय, प्रशासकीय, उद्योग, लघु उद्योग, व्यावसायिक, शेती, प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया,

प्रिंट डिजिटल मीडिया, संपादक, प्रतिनिधी, जेष्ठ पत्रकार, साहित्यिक यांच्या सहित विविध क्षेत्रात

करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा पनवेल तालुक्याच्या वतीने मंत्रिमहोदय, खासदार, आमदार, कलाकार, यांच्या शुभहस्ते पनवेलमधील धडाडीच्या समाजसेविका व आपला सत्यवार्ता वृत्तपत्राच्या संपादिका सन्माननीय रुपालीताई शिंदे यांना " पनवेल नारीशक्ती " ह्या पुरस्काराने सन्मानपूर्वक गौरविण्यात येणार आहे. 

सदरचा सन्मान पुरस्कार सोहळा वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरु होणार आह. पनवेल नारिशक्ती पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल रुपालीताई शिंदे यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

Popular posts
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य विज्ञान प्रयोग प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन
Image
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी!
Image
पनवेल वाहतूक शाखेने हरविलेली बॅग दिली मिळवून
Image
डॉ. नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचालित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत बालदिन उत्साहात साजरा
Image
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
Image