कर्जत-खालापूर श्री २०२५" चे आयोजन, प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती

 कर्जत-खालापूर श्री २०२५" चे आयोजन, प्रीतम म्हात्रे यांची उपस्थिती

पनवेल : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोशिएशन संल्गन रायगड बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोशिएशन यांच्या मान्यतेने खोपोली शहर बॉडी बिल्डर्स असोशिएशन यांच्या सहयोगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दिपक ब्रदर्स आयोजित "कर्जत-खालापूर श्री २०२५" चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई श्री, महाराष्ट्र श्री, मिस्टर इंडिया मिस्टर ऑलम्पिया आकर्षण समीर दाभिलकर आणि जगातला सर्वात कमी उंचीचा बॉडीबिल्डर व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव कोरणारा प्रतिक मोहिते उपस्थित होते. यावेळी शेकाप नेते प्रीतम जे एम म्हात्रे उपस्थित होते.
            ५० किलो, ५५ किलो, ६० किलो, ६५ किलो, ७० किलो वरील अशाप्रकारे पाच वजनी गट सामन्यांचे उत्कृष्टपणे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धकांसाठी आकर्षक चषक व प्रमाणपत्र, बेस्ट पोझर साठी रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शेकाप नेते प्रीतम जे एम म्हात्रे यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.