"आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश: साईनगर येथे बसवण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे नागरिकांचा होणार सुरक्षित प्रवास!"


"आमदार विक्रांत दादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश: साईनगर येथे बसवण्यात आलेल्या गतिरोधकांमुळे नागरिकांचा होणार सुरक्षित प्रवास!"


पनवेल(प्रतिनिधी)दि.१५ एप्रिल २०२५: साईनगर परिसरातील रस्त्यांवर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रित नव्हता. यामुळे सातत्याने अपघात घडत होते. या रस्त्यांवर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांची नेहमीच वर्दळ असते. मात्र, गतिरोधकांच्या अभावामुळे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने चालवत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता.या विषयांत साईनगरातील सर्व सोसायटीधारकांनी आमदार विक्रांत दादा पाटील यांच्याकडे गतिरोधक बसवण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या अडचणी जाणून आमदार विक्रांत दादा पाटील यांनी साईनगर, पनवेल परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत,तातडीने पावले उचलून. महापालिका विभागाला स्पीड ब्रेकर बसविण्याबाबत पत्र दिले,त्यांच्या या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि त्वरित कार्यवाहीमुळे साईनगरातील रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे.या गतिरोधकांमुळे आता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. याबद्दल साईनगरातील सर्व सोसायटीधारकांनी आमदार विक्रांत दादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते मराठा भवन कार्यालयाचे भव्य उद्घाटन आणि मराठा कृतज्ञता मेळावा उत्साहात संपन्न
Image
यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्र व कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था सिवूड नेरूळ नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने_ भव्य सत्कार समारंभ
Image
सिडकोच्या मुजोर धोरणांना लगाम; विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image