देसले कुटुंबीयांच्या कायम सोबत;लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून धीर

देसले कुटुंबीयांच्या कायम सोबत;लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून धीर 

पनवेल (प्रतिनिधी) जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दिलीप देसले यांच्या कुटुंबीयांची माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट घेत सात्वंन केले. कोणतीही मदत भासल्यास माझ्या घराचे दरवाजे देसले कुटुंबासाठी कायम उघडे आहेत. देसले यांचे निधन पनवेलकरांसाठी वेदनादायी आहे. मात्र यापुढे त्यांच्या पश्चात देसले कुटुंबीयांच्या कायमसोबत आहे, अशी ग्वाही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिली.  पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले मृत्युमुखी पडले. त्यांच्या शोकाकूल कुटुंबाची खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी भेट घेत सांत्वन केले. 

           यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धीर देत देसले कुटुंबीयांची विचारपूस केली. या हृदयद्रावक परिस्थितीत मी स्वतः कायम देसले कुटुंबासोबत आहे. कुटुंबाचा शोक मन हेलावणारा आहे. कोणत्याही प्रसंगात आम्ही देसले कुटुंबीयांच्या हाकेला धावत येऊ, हा माझा शब्द आहे, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगत देसले कुटुंबाला मोठा धीर दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, ऍड. प्रकाश बिनेदार, समीर ठाकूर, जगदीश घरत, सुधाकर थवई, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, जितेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते.

Popular posts
अशोक गावडे फाऊंडेशन आणि श्री गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ यांच्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले
Image
मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका
Image
रायगड जिल्ह्यातील कला शिक्षकांची जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
Image
विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न विशेष क्रीडा नैपुण्य पारंगत असावे__नागेंद्र म्हात्रे
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेचे दत्तात्रय (दत्ता म्हात्रे) वस्तीगृहाचे उदघाटन संस्थेचे चेरमन श्री.बबन दादा पाटील याच्या हस्ते संपन्न
Image