व्हॉट्सॲप समूहावर मुख्यमंत्र्यांची बदनामी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात पनवेल पोलिसांत गुन्हा दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केल्याने भाजप युवा कार्यकर्ते देवांशू संतोष प्रभाळे (रा. समर्थ कृपा बिल्डिंग, पनवेल) यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आम्ही पनवेलकर या व्हॉट्सप ग्रुपवर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचा आणि समाजामध्ये द्वेषाची भावना आणि गटातटात दंगलीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा व्हिडीओ पोस्ट केला. आणि त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अशा भावना व्यक्त झाल्या. त्या अनुषंगाने या प्रकरणी नाखवा अबू बकर (व्हॉट्सअॅप क्रमांक ९६९९१५१३९०) आणि एका महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. समाजात अफवा पसरविणे, शांतता भंग केल्याचा गुन्हा नोंदवला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक अभय कदम हे तपास करीत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून संबंधित आरोपींचा शोध घेत आहेत.