सीकेटी महाविद्यालयात आंतर-महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा

सीकेटी महाविद्यालयात आंतर-महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा 




पनवेल/प्रतिनिधी 

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज न्यू पनवेल (स्वायत्तआणि मुंबई विद्यापीठ यांच्या समन्वयाने आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धा दिनांक  ५ व ६ मार्च  रोजी आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे सीकेटी कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस.के.पाटील यांच्या हस्ते झाले. 

 या स्पर्धेमध्ये ६ महाविद्यालयातील मुलींच्या ४ संघानी  व  मुलांच्या ६ संघांनी सहभाग नोंदविला आहे. आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये डी. जी. रुपारेल कॉलेज, माटुंगाचांगु काना ठाकूर आर्टस्कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेजन्यू पनवेलआर. ए. पोतदार कॉलेज, माटुंगाविवेकानंद कॉलेज,चेंबूरजी.एन. खालसा  कॉलेज माटुंगा आणि पिल्लई कॉलेज, न्यू पनवेल इत्यादी महाविद्यालये सहभागी झाली आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईकसहसंचालक प्रा. अनिल नाक्ती व प्रा. प्रतिज्ञा पाटीलजिमखाना विभागाचे सर्व सदस्य यांनी विशेष मेहनत घेत आहेत.